‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ शोमध्ये दिशा वकानीच्या जागी ‘ही’ अभिनेत्री साकारणार ‘दयाबेन’ची भूमिका?

Television Show Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Disha Vakani Aka Dayaben To Be Replaced


टीव्हीवरील सर्वात प्रसिद्ध कार्यक्रमांपैकी एक असलेला ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ हा कार्यक्रम आपल्या अनोख्या व्यक्तिरेखेमुळे नेहमीच आपल्या प्रेक्षकांचे मनोरंजन करत आला आहे. यामधील दिलीप जोशी, मुनमुन दत्ता, शैलेष लोढा यांसारखे अभिनेते आपल्या अंदाजाने चाहत्यांना हसवतात. या कार्यक्रमामध्ये प्रत्येक व्यक्तिरेखेची आपली वेगळी ओळख आहे. परंतु दयाबेन एक असे पात्र आहे, जे आपल्या डायलॉगच्या टायमिंगने प्रेक्षकांना हसवण्याची एकही संधी सोडत नाही. मागील काही काळापासून दयाबेनची भूमिका साकारणारी ‘दिशा वकानी’ या कार्यक्रमात पुनरागमन करणार की नाही, याबाबत बऱ्याच चर्चा रंगल्या आहेत.

खरं तर सन २०१७ मध्ये दिशाने मॅटर्निटी लीव्हसाठी कार्यक्रमातून ब्रेक घेतला होता. यानंतर ती पुन्हा शोमध्ये आली नाही. ‘हे माँ माताजी’ आणि ‘टप्पू के पापा’ यांसारखे डायलॉग बोलून चाहत्यांचे मनोरंजन करणाऱ्या दिशाची चाहते खूप आठवण काढत आहेत.

 

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ कार्यक्रमामध्ये अनेक वेळा दिशाला बदलण्यात येण्याच्या बातम्या होत्या. परंतु त्या सर्व अफवा ठरल्या होत्या. माध्यमांमध्ये अनेकवेळा  असे वृत्त आले होते की, कार्यक्रमाचे निर्माते दयाबेनच्या भूमिकेसाठी दुसरी अभिनेत्री शोधत आहेत.

दिशा वकानीने ‘दयाबेन’च्या भूमिका अशाप्रकारे साकारली आहे की, तिची जागा घेणे कोणत्याही अभिनेत्रीसाठी नक्कीच आव्हानात्मक ठरेल.

तरीही, माध्यमांमध्ये असे वृत्त आहे की, दिशा कदाचित कार्यक्रमामध्ये पुनरागमन करणार नाही. तिच्या जागी इतर अभिनेत्रीला घेतले जाईल.

 

दयाबेनची भूमिका साकारून प्रत्येक घराघरात पोहोचलेल्या दिशाच्या जागी इतर कोणत्याही अभिनेत्रीला पाहणे चाहत्यांसाठी जरा कठीणच ठरेल.

माध्यमांमध्ये असे वृत्त होते की, दिशा वकानी आपल्या दयाबेनच्या भूमिकेसाठी निर्मात्यांसोबत वाटाघाटी केली होती. परंंतु त्यानेही काहीच होऊ शकले नाही.

दयाबेनप्रमाणे डायलॉग बोलणे कोणत्याही अभिनेत्रीसाठी नक्कीच कठीण आहे. या भूमिकेत फिट होणे सोपे नाही. परंतु असे म्हटले जात आहे की, नागिन ४ मधील अभिनेत्री राखी विजानला दयाबेनची भूमिका साकारायची आहे.

 

माध्यमांशी बोलताना राखी विजानने म्हटले होते की, “कोणीही दयाबेन बनू शकत नाही. कारण ती आयकॉनिक आहे. परंतु मला संधी दिली पाहिजे. मला दयाबेनची भूमिका साकारायची आहे.” तरीही आतापर्यंत हे स्पष्ट झाले नाही की, दयाबेनसाठी राखीला साईन केले आहे की नाही.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-पहिले लग्न सैफला पडले होते भलतेच महागात, घटस्फोटानंतर अमृताला दिले होते ‘इतके’ कोटी रुपये

-रुपेरी पडद्यावर पहिला ‘किसिंग सीन’ देणारी अभिनेत्री, जिला भारतीय म्हणायचे पहिली सुपरस्टार

-पेंटर बनण्याची इच्छा असणाऱ्या मुलाने चित्रपटाचे शुटिंग पाहिले, मनं बदललं आणि आज झालाय इंडस्ट्रीतील ‘बाप’ दिग्दर्शक


Leave A Reply

Your email address will not be published.