‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम अभिजित खांडकेकर म्हणजेच आपल्या सर्वांचा लाडका गुरू. या मालिकेने अभिजितला खूप ओळख दिली आहे. नकारात्मक भूमिका साकारून देखील त्याने प्रेक्षकांच्या मनात त्याची जागा निर्माण केली आहे. बुधवारी (७ जुलै) अभिजितचा वाढदिवस आहे. तर जाणून घेऊया त्याचा अभिनय क्षेत्रातील प्रवास. (Birthday special : Abhijit khandakekar’s career journey)
अभिजितचा जन्म ७ जुलै १९८६ साली पुण्यात झाला. त्याचे बालपण पुण्यातच गेले आणि शिक्षण देखील पुण्यातच पूर्ण झाले. तो अभिनय क्षेत्रात येण्याआधी एक आरजे होता. त्यानंतर तो अभिनय क्षेत्राकडे वळाला. तो झी मराठीवरील ‘महाराष्ट्राज सुपरस्टार’ या कार्यक्रमात सहभागी झाला.
अभिजितने २०१० साली झी मराठी या वहिनीवरील ‘माझी या प्रियाला प्रीत कळेना’ का मालिकेत मृणाल दुसानिससोबत मुख्य भूमिकेत काम केले होते. त्यांची प्रेम कहाणी खूप लोकप्रिय झाली होती. त्यानंतर त्याने पुन्हा एकदा झी मराठीवरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत काम केले. या मालिकेने जवळपास ५ वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन केले. या मालिकेत त्याने अनिता दाते आणि रसिका सुनीलसोबत मुख्य पात्र निभावले होते. या मालिकेत एक लव्ह ट्राऍंगल दाखवला होता.
त्याने २०१३ साली अभिनेत्री सुखदा खांडकेकर हिच्याशी विवाह केला. सुखदा देखील एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे. सध्या ती ‘अहिल्या’ हा हिंदी मालिकेत काम करत आहे.
अभिजितने ‘जय महाराष्ट्र: ढाबा बठिंडा’, ‘भय’, ‘मी पण सचिन’, ‘ढोल ताशे’, ‘मामाच्या गावाला जाऊया’, ‘ध्यानी मनी’, ‘बाबा’ या चित्रपटात काम केले आहे. सध्या तो ‘क्रिमिनल्स : चाहूल गुन्हेगाराची’ या मालिकेत होस्ट म्हणून काम करत आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-