मनजोत सिंगला ‘फुकरे’ चित्रपटातून मिळाली खरी ओळख; तर आता पडद्यावर रोमँटिक सीन करायची ईच्छा केली जाहीर


‘ओय लकी !! लकी ओये!’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा अभिनेता म्हणजे मनजोत सिंग. परमजोत सिंग आणि अमृत कौर सिंग यांचा मुलगा मनजोत सिंग. आज त्याचा वाढदिवस आहे. त्याचा जन्म ७ जुलै १९९२ मध्ये दिल्ली येथे झाला होता. ही खरंतर त्याच्या अभिनयाची कमाल म्हणावी लागेल की, एवढ्या कमी वयात त्याने त्याचे नाव कमावले आहे. त्याने एवढ्या कमी वयात बेस्ट ॲक्टर फिल्म फेअर क्रिटिक अवॉर्ड जिंकला आहे. आता मोठ्या पडद्यावर रोमान्स करण्याची त्याची इच्छा आहे. (Fukrye fame actor manjot Singh’s birthday, let’s know about him)

मनजोत सिंगने त्याच्या करिअरची सुरुवात २००८ मध्ये ‘ओय लकी!! लकी ओये!’ या चित्रपटातून केली. या चित्रपटात अभय देओल, ऋचा चड्डा, परेश रावल आणि नीतू चंद्रा यांसारखे कलाकार होते. या चित्रपटाचे दिग्दर्शक दिबाकर बॅनर्जी हे होते. या चित्रपटात एवढ्या सगळ्या अनुभवी कलाकारांमध्ये मनजोतने त्याची जागा प्रस्थापित केली होती. केवळ १७ वर्षाच्या मुलाचा अभिनय पाहून सगळेच त्याचे कौतुक करत होते.

माध्यमातील वृत्तानुसार, मनजोत सिंगने त्याच्या मनातील इच्छा सांगितली होती. त्याने सांगितले होते की, “आतापर्यंत मला जेवढ्या संधी मिळाल्या आहेत, तेवढ्यात मी खुश आहे. मला माहित आहे की, पडद्यावर लोकांना माझ्या क्यूटनेस आणि मस्तीमुळे मी आवडतो. परंतु मी आता मोठा झाला आहे आणि मला आता पडद्यावर रोमँटिक सीन करायचा आहे. बॉलिवूडमध्ये एक रोमँटिक हीरो बनण्याचे स्वप्न प्रत्येक अभिनेता बघत असतो. मला माहित आहे की, रोमँटिक हीरोची ओळख प्रेक्षकांच्या मनात खूप वेळापर्यंत असते.”

मनजोतला‌ खरी ओळख ‘फुकरे’ या चित्रपटातून मिळाली. या चित्रपटात त्याने ‘लल्ली’ हे पात्र निभावले होते. या कॉमेडी चित्रपटात काम केल्यानंतर तो खूप प्रसिद्ध झाला. त्यानंतर त्याने ‘उडान’, ‘स्टूडेंट ऑफ द इअर’, ‘अजहर’ आणि ‘फुकरे रिटर्न्स’ या चित्रपटात काम केले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.