भारतासह जगातील कोरोनाचा कहर कमी होत असला तरी सर्व काही अद्याप सुरळीत झालेले नाही. अशात प्रत्येक जण देवाकडे ही महामारी संपण्याची प्रार्थना करत आहेत. कारण प्रत्येकाचीच मोठी कामे अजूनही रखडलेली आहेत. या कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनचा फटका सिनेसृष्टीला ही मोठा बसला बसला आहे. महाराष्ट्रात जरी चित्रपटाच्या शूटिंगला परवानगी देण्यात आली असली, तरी सिनेमागृह बंदच ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे अनेक कलाकार लवकरात लवकर सिनेमागृह खुली करण्यासाठी प्रार्थना करत आहेत. अशात अभिनेत्री शालिनी पांडे देखील सिनेमागृह कधी उघडणार याची वाट पाहत आहे.
दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने कमी वयातच मोठी झेप घेतलेली शालिनी गुरुवारी (२३ सप्टेंबर) तिचा वाढदिवस साजरा करते. जन्मदिनी आपल्याला काही, तरी स्पेशल आणि खास गिफ्ट मिळावे असे सर्वांनाच वाटते. इतरांप्रमाणे शालिनीला देखील खास गिफ्ट हवे आहे. पण तिला या गिफ्टमध्ये तिच्या आगामी चित्रपटासाठी महाराष्ट्रात सिनेमागृह उघडण्यात यावे या भेटीची अपेक्षा आहे.
शालिनीचा जन्म २३ सप्टेंबर १९९३ रोजी मध्यप्रदेशातील जबलपूर येथे झाला. २३ सप्टेंबर गुरुवारी ती २८ व्या वर्षात पदार्पण करत आहे. दाक्षिणात्य सिनेसृष्टीत तिने आजवर अनेक हिट चित्रपट केले आहेत. तिच्या अभिनयाने आणि क्युटनेसने ती चाहत्यांची मने नेहमीच जिंकते. ‘जयेशभाई जोरदार’ या हिंदी चित्रपटामधून ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. चित्रपटाचे शूटिंग, तर केव्हाच संपले, पण अजून प्रदर्शनाचा मुहूर्त काही टीमला मिळत नाही. कोरोनामुळे चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित केला, तर खास कमाई नाही करू शकणार त्यामुळे त्याच्या प्रदर्शनाची तारीख लांबणीवर ठेवली आहे.
शालिनीने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, “मी गेले एक वर्ष या चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहत असून, आता मला वाट पाहणं खूप असह्य होत आहे. मला माहित आहे हा खूप चांगला आणि जबरदस्त चित्रपट आहे. हा चित्रपट आम्ही खूप प्रेमाने बनवला आहे. मोठ्या पडद्यासाठी बनलेला हा माझ्या आयुष्यातील पहिला हिंदी चित्रपट असून, याचा अनुभव खरोखरच माझ्यासाठी खूप खास, संस्मरणीय आणि भावनात्मक आहे.”
शालिनीच्या या पहिल्या हिंदी चित्रपटाला घेऊन यशराज फिल्म्स देखील खूप उत्साहीत दिसून येत आहे. तिच्या पारड्यात आता यशराजचे तीन चित्रपट देखील आहेत. तिच्या आगामी चित्रपटाची घोषणा देखील लवकरच केली जाणार असून, या चित्रपटामध्ये देखील ती बॉलिवूडच्या मोठ्या सुपरस्टारसह झळकणार असल्याची माहिती आहे. सध्या आदित्य चोप्रा स्वतः तिला अनेक गोष्टींचे धडे देत आहेत. तसेच तिच्या कामावर देखील लक्ष ठेवून आहेत.
यशराजसह असलेल्या संबंधांविषयी विचारले असता तिने मुलाखतीमध्ये सांगितले की, “यशराजसोबत बरोबर तीन चित्रपटांचा करार करणे ही मोठी बाब आहे. एखाद स्वप्न पडावं आणि ते खरं व्हावं अशा पद्धतीचं हे यश आहे. मी लहानपणापासूनच यशराज फिल्म्सचे चित्रपट पाहून मोठी झाले. तसेच मला सुरुवातीपासूनच इथे काम करायचे होते. माझे आई – बाबा देखील फार खुश आहेत. माझ्या बाबांना चित्रपट पाहणे फार आवडते. त्यामुळे ते देखील माझ्या ‘जयेशभाई जोरदार’ चित्रपटाची वाट पाहत आहेत. खरं सांगायचं, तर माझ्या आयुष्यातील एवढ्या मोठ्या यशाची मी कल्पना देखील नव्हती केली.”
अभिनेत्रीच्या ‘जयेशभाई जोरदार’ चित्रपटामध्ये अभिनेता रणवीर सिंग देखील आहे. शालिनीने आता पर्यंत तेलगू आणि तामिळ चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. तिने साल २०१७मध्ये ‘अर्जुन रेड्डी’ या चित्रपटामधून सिनेसृष्टीत पाऊल ठेवले. या चित्रपटामध्ये तिच्यासह विजय देवरकोंडाने मुख्य भूमिका साकारली होती. या दोघांच्या ‘अर्जुन रेड्डी’ चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगलेच डोक्यावर घेतले होते. शालिनीने ‘मन मै है विश्वास’ आणि ‘क्राईम पेट्रोल’मध्ये देखील दमदार भूमिका साकारल्या आहेत.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
–श्रीदेवी यांच्या हिट गाण्यावर जबरदस्त नाचली पाकिस्तानी अभिनेत्री आयजा खान
–फॅन्सला पुन्हा झाला बिग बॉस फेम सोनाली फोगट यांच्या जबरदस्त डान्सचा ‘दिदार’