संजीदा शेख (Sanjeeda Sheikh) टेलिव्हिजन जगातील सुंदर चेहऱ्यांपैकी एक आहे. अभिनेत्री खासकरून तिच्या सौंदर्यासाठी, अभिनयासाठी ओळखले जाते. अभिनयाच्या जोरावर तिने भलामोठा चाहतावर्ग कमावला आहे. अभिनयाव्यतिरिक्त, संजीदा ब्यूटी सलून देखील चालवते. तिच्या ब्यूटी सलूनचे नाव ‘संजीदा पार्लर’ असे आहे.
संजीदा सोमवारी (२० डिसेंबर) तिचा वाढदिवस साजरा करत आहे. तिचा जन्म २० डिसेंबर १९८४ रोजी, कुवैत येथे झाला. संजीदा मुस्लिम कुटुंबातील आहे. तिचे कुटुंब गुजरातमधील अहमदाबाद येथील होते. पुढे अभिनयाची सुरुवात करण्यासाठी संजीदा मुंबईतच्या दिशेने वळाली. संजीदाने आपल्या मेहनतीने टीव्ही इंडस्ट्रीत आपले मजबूत स्थान निर्माण केले.
साल २००३ मध्ये अभिताभ बच्चन यांच्यासोबत ‘बागबान’ या चित्रपटात काम करून, तिने तिच्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर ती टेलिव्हिजन मालिकेमध्ये दिसू लागली. मेहनतीच्या जोरावर संजीदा टेलिव्हिजनची प्रसिद्ध अभिनेत्री बनली. तिने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. ईथेच तिची भेट आमिर आलीशी झाली, जो तिचा प्रियकर आणि नंतर तिचा पती झाला.
संजीदाने २००५ मध्ये ‘क्या होगा निम्मो का’ या मालिकेतून टेलिव्हिजनवर पदार्पण केले. त्यानंतर २००७ मध्ये स्टार प्लसवरील ‘कयामत’ या मालिकेत ती दिसली. त्याच वर्षी ती तिच्या पतीसोबत ‘नच बलिये ३’मध्ये सहभागी झाली होती. त्यानंतर तिने अनेक मालिकांमध्ये काम केले. ‘एक हसीना थी’, ‘इश्क का रंग सफेद’ आणि ‘कुमकुम भाग्य’मध्ये तिने काम केले आहे. संजीदाने अनेक चित्रपटांमध्ये देखील काम केले. २०२० मध्ये ‘तैश’ या चित्रपटातून तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
संजीदाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे झाले, तर तिने तिचा प्रियकर आमिर अलीशी २ मार्च २०१२ रोजी लग्न केले होते. हे दोघे बराच काळ एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते. हे दोघे टेलिव्हिजनवरील लोकप्रिय जोडींपैकी एक मानले जातात. पण या दोघांनी २०२० मध्ये वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर संजीदा तिच्या आईसोबत राहू लागली. या दोघांना एका वर्षाची मुलगी देखील आहे. तिचा जन्म सरोगेसीद्वारे झाला होता. संजीदा आणि आमिर यांनी त्यांचे आठ वर्षाचे नाते २०२० मध्ये संपवले.
हेही वाचा-