Wednesday, December 6, 2023

मनी लाँड्रिंग प्रकरण: मनी लाँड्रिंग प्रकरणात, शिल्पा शेट्टीसह श्रद्धा कपूरही आली ईडीच्या रडारवर

ठग सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrashekhar) २०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे, गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. आता चौकशी करणार्‍या अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) रडारवर बॉलिवूडची अनेक नामांकित नावे आली आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लवकरच एजन्सी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची चौकशी करू शकते.

‘या’ कारणामुळे सुकेश चंद्रशेखरने साधला होता शिल्पा शेट्टीशी संपर्क
चंद्रशेखर याने अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) दिलेल्या निवेदनात दावा केला आहे की, राज कुंद्राच्या सशर्त सुटकेसाठी, त्याने शिल्पा शेट्टीशी (Shilpa Shetty) संपर्क साधला होता. एवढेच नाही, तर एनसीबी प्रकरणात त्याने श्रद्धा कपूरलाही (Sharddha Kapoor) मदत केली. त्याच्या म्हणण्यानुसार, तो २०१५ पासून श्रद्धाला ओळखतो. त्याने असाही दावा केला की, तो अभिनेता हरमन बावेजासोबत (Harman Baveja) ‘कॅप्टन’ हा चित्रपट बनवणार आहे, ज्यात कार्तिक आर्यन (Kartik Aryan) मुख्य भूमिकेत आहे. (sukesh money laundering case many film personalities with shraddha kapoor shilpa shetty on ed s radar)

खरं तर तुरुंगातून बाहेर काढण्याच्या बहाण्याने, सुकेशने रॅनबॅक्सीच्या माजी संस्थापकाच्या कुटुंबाची २०० कोटी रुपयांची फसवणूक केली होती.

सध्या तो तुरुंगात आहे. एजन्सीने सांगितले की, त्याने बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही यांना महागड्या गाड्या भेट दिल्या आहेत. पटियाला हाऊस कोर्टाने अलीकडेच सुकेश चंद्रशेखर आणि त्याची पत्नी लीना मारिया पॉल आणि इतरांविरुद्ध दाखल केलेल्या ईडीच्या आरोपपत्राची दखल घेतली. ईडीने तपासादरम्यान चंद्रशेखर आणि त्याच्या साथीदारांसाठी अनेक ठिकाणी शोधमोहीम राबवली आहे.

१६ आलिशान गाड्या केल्या जप्त
तपास यंत्रणेला चंद्रशेखर आणि त्याची पत्नी लीना मारिया पॉल यांच्याकडे असलेल्या १६ महागड्या गाड्याबद्दल माहिती मिळाली. चौकशीत चंद्रशेखरने हे सर्व पैसे लपवण्यासाठी जाणीवपूर्वक केल्याची कबुली दिली. चंद्रशेखर आणि लीना मारिया पॉल यांच्यासह इतर आरोपींना यापूर्वी दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. त्याने हवालद्वारे पैसे जमवले आणि बनावट कंपन्यांच्या माध्यमातून गुंतवणूक केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.

हेही वाचा-

हे देखील वाचा