Monday, July 1, 2024

B’day Special | बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा पाकिस्तानी अभिनेता अली जफरच्या चित्रपटावर त्याच्याच देशात घालण्यात आली होती बंदी

अली जफर (ali jafar)हा एक असा अभिनेता आहे ज्याने बॉलिवूड आणि लॉलीवूडमध्ये नाव कमावले आहे, जो अष्टपैलू आहे. 18 मे 1980 रोजी लाहोर, पाकिस्तानमध्ये जन्मलेल्या अली जफरने ‘तेरे बिन लादेन’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. अली एक अभिनेता, मॉडेल, गायक, गीतकार, पटकथा लेखक, निर्माता आहे. अनेक पाकिस्तानी अभिनेते-अभिनेत्री बॉलीवूडमध्ये आपले नशीब आजमावण्यासाठी आणि एक अद्भुत कारकीर्द घडवण्यासाठी येतात. अली जफरही त्यापैकीच एक. अलीच्या 43व्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया.

अली जफरने आपल्या करिअरची सुरुवात टीव्हीपासून केली आणि हळूहळू बॉलिवूडमध्ये पोहोचला. अलीला भारतात खूप प्रेम मिळाले आणि अनेक पाकिस्तानी कलाकार भारतीय चित्रपट उद्योगाकडे वळले. उत्तम अभिनय दाखवणाऱ्या अलीला गायनातून ओळख मिळाली. 2003मध्ये त्यांच्या पहिल्या म्युझिक अल्बम ‘हुक्का पानी’ मधील ‘छन्नो’ या गाण्यामुळे त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. जगभर अल्बमच्या 5 दशलक्षाहून अधिक प्रती विकल्या गेल्या यावरून जफरच्या यशाचा अंदाज लावता येतो.

हिमेश रेशमिया आणि प्रीतम यांनी अली जफरचे हे गाणे बॉलिवूडसाठी रिमेक केले आहे. अली, त्याच्या पहिल्या अल्बमच्या जबरदस्त यशाने आनंदित झाला, त्याने 2006मध्ये ‘मस्ती’ नावाचा दुसरा अल्बम रिलीज केला. बॉलिवूड अलीकडे आकर्षित होत होते. पाकिस्तानमध्ये नाव कमावल्यानंतर अलीने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला आणि 2010मध्ये ‘तेरे बिन लादेन’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटावर पाकिस्तानात बंदी घालण्यात आली होती. पण भारतीय प्रेक्षकांमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. अली जफरला या चित्रपटासाठी आयफा, झी सिने पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट पुरुष पदार्पण असे पुरस्कार मिळाले.

हॅण्डसम पाकिस्तानी अभिनेता अली जफरला पहिल्या चित्रपटानंतर अनेक चित्रपटांमध्ये साईन करण्यात आले. सुमारे 40 चित्रपटांमध्ये काम केलेला अली भारतीय प्रेक्षकांचे प्रेम विसरू शकलेला नाही. ‘मेरे ब्रदर की दुल्हन’ चित्रपटाच्या 9व्या वर्धापन दिनानिमित्त पोस्टर शेअर करताना त्याने आपल्या मनातील गोष्ट सांगितली होती. हा चित्रपट भारताबरोबरच पाकिस्तानातही खूप पाहिला गेला.(birthday special ali zafar bollywood debut film was ban in his country pakistan)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

नागिनसारखं डाेलत उर्फीने केला डान्स; युजर्स म्हणाले, ‘आ गई जंगली कहीं की…’
तांत्रिक अडचणींमुळे ‘चाैक’ चित्रपटाच्या प्रदर्शनात माेठा बदल, ‘या’ तारखेला प्रदर्शित हाेणार चित्रपट

हे देखील वाचा