देश सध्या कोरोना व्हायरसच्या दुसर्या लाटेशी जिवाच्या आकांताने झुंज देत आहे. मृतांची संख्या सातत्याने वाढत आहे, त्यामुळे दररोज नोंद होणाऱ्या घटनांची आकडेवारी नवीन विक्रम करतच आहे. जगभरातील लोक भारतात निर्माण झालेल्या या परिस्थितीबद्दल केवळ सहानुभूतीच व्यक्त करत नाहीत, तर मदतीची विनंती देखील करत आहेत.
अशा वेळी पाकिस्तानी अभिनेता आणि गायक अली जफरने देखील, बुधवारी (५ मे) आपल्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओद्वारे त्याने मानवतेची आठवण करून देत, भारतासाठी प्रार्थना केली.
अलीने आपल्या व्हिडिओमध्ये म्हटले की, या कठीण काळात लोकांनी माणुसकी दाखवावी आणि एकमेकांसाठी प्रार्थना करावी. हिंदुस्थानातील लोकांनो, या कठीण काळात आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत.
https://www.instagram.com/p/COiZI8yALKS/?utm_source=ig_web_copy_link
अली व्हिडिओमध्ये म्हणाला होता की, “हिंदुस्थानातील लोकांनो, तुम्ही ज्या कठीण वेळ आणि परिस्थितीतून जात आहात, त्याचा अंदाज बांधता येऊ शकत नाही. इथे पाकिस्तानातही लोक खूप कठीण परिस्थितीत आहेत, चिंतेत आहेत. परंतु कदाचित ही कठीण वेळ आहे, ज्यात आपण पाहतो आणि शिकतो की, माणुसकी काय आहे माणुसकीपेक्षा अधिक काहीच नाही.”
पुढे तो म्हणाला, “या कठीण काळात मी आणि सर्व पाकिस्तानी तुमच्याबरोबर उभे आहोत आणि तुमच्यासाठी प्रार्थना करत आहोत. देव तुम्हाला तंदुरुस्ती देवो, तुमच्या अडचणी लवकरात लवकर दूर व्हाव्यात, समृद्धी येवो, हीच प्रार्थना सर्व पाकिस्तानी लोकांसाठी आणि जगातील सर्व लोकांसाठी आहे. चला, आपण एकमेकांसाठी मनापासून प्रार्थना करूया. ही काळाची गरज आहे.”
पाकिस्तानी अभिनेता- गायक अली जफर हा बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांचा एक भाग आहे. अलीने ‘डिअर जिंदगी’, ‘चश्मेबद्दूर’, ‘किल-बिल’, ‘मेरे ब्रदर की दुल्हन’, ‘टोटल सियापा’ सारख्या बर्याच चित्रपटात महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-चित्रपटांपासून दूर असलेली अभिनेत्री करतेय शेती, पाहा आंब्याच्या बागेतील जुही चावलाचे व्हायरल फोटो