दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीसह संपूर्ण जगभरातील चाहत्यांना आपल्या अभिनयाने आपला दीवाना करणारे अभिनेते म्हणजे नागार्जुन अक्किनेनी होय. नागार्जुन हे मागील अनेक दशकांपासून चित्रपटसृष्टी सक्रीय आहेत. अशातच आज 29 ऑगस्ट रोजी त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण त्यांच्या आणि नागार्जुन यांच्या प्रेमकथेविषयी जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया…
अमला यांचा जन्म 12 सप्टेंबर,1967रोजी कोलकाता येथे झाला होता. अमला यांनी सुपरस्टार नागार्जुन यांच्याशी सन २1992मध्ये लग्न केले. दोघांची प्रेमकथा खूप गोड आहे. ही प्रेमकथा एखाद्या फिल्मी कथेपेक्षा कमी नाही. अमला या कारकिर्दीच्या शिखरावर असताना त्यांचे लग्न नागार्जुन यांच्याशी झाले होते. विशेष म्हणजे त्यांची प्रेमकथा सुरू झाली, त्यावेळेस नागार्जुन आधीपासूनच विवाहित होते.
अशाप्रकारे सुरू झाली प्रेमकथा
अमला यांनी मॉडेल म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली होती. मॉडेलिंग केल्यानंतर त्यांनी चित्रपट जगतात पाऊल ठेवले. नागार्जुन आणि अमला यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. शूटिंग दरम्यान हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. या दोघांनी अनेकदा एकत्र वेळ घालवला.
माध्यमांतील वृत्तानुसार, अमला त्यांच्या एका चित्रपटाचे शूटिंग करत होत्या. त्या काळात नागार्जुन त्यांना सरप्राईझ देण्यासाठी सेटवर पोहोचले होते. ते अमला यांना भेटले. त्यावेळेस अमला रडत होत्या. जेव्हा नागार्जुन यांनी त्यांना रडण्याचे कारण विचारले, तेव्हा अमला यांनी सांगितले की, “पुढच्या सीनमध्ये त्यांचे घालायचे कपडे खूप विचित्र आहेत आणि त्यांना ते घालायचे नाही.” यावर नागार्जुन यांनी त्यांना सांगितले की, “ते त्यांच्या दिग्दर्शकाशी बोलतील.” त्यानंतर नागार्जुन यांनी दिग्दर्शकाशी बोलून त्यांचे कपडे बदलले. नागार्जुनच्या या वागण्याने अमला प्रभावित झाल्या आणि अमला यांच्या मनातही नागार्जुन यांच्याबद्दल प्रेम जागृत झाले. त्यावेळी त्यांच्या नात्याबद्दल बातम्या येऊ लागल्या, पण दोघांपैकी कोणीही याची अधिकृत माहिती दिली नाही.
परदेशात केले होते प्रपोज
अभिनेत्री अमला आणि नागार्जुन एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी परदेशात गेले होते. जिथे त्यांनी अमला यांना खास पद्धतीने प्रपोज केले. त्यानंतर नागार्जुन यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला. नागार्जुन आणि अमला यांनी11992मध्ये लग्न केले. लग्नात फक्त कुटुंबातील सदस्य आणि खास मित्र उपस्थित होते. अमला आणि नागार्जुन यांना एक मुलगा अखिल आहे. अखिल देखील त्याच्या वडिलांप्रमाणे अभिनेता आहे.
हेही नक्की वाचा-
–रक्षाबंधन स्पेशल! ‘हे’ कलाकार आपल्या भावा-बहिणींसोबत साजरे करतात रक्षाबंधन
–सुपरहिट चित्रपट देऊन नागार्जुनने जिंकली चाहत्यांची मने; लग्न झालेले असतानाही होता ‘या’ अभिनेत्रीच्या प्रेमात