Friday, July 5, 2024

वयाच्या चाळीशी मध्ये लग्न केलेल्या या जेष्ठ अभिनेत्रींनी घेतला कधीही आई न होण्याचा निर्णय

चित्रपटसृष्टीत येणारी प्रत्येक व्यक्ती आपल्या उराशी मोठी स्वप्ने बाळगून आलेली असते. काही जण आपल्या आवडीनुसार तर काही जण परिस्थितीनुसार हे क्षेत्र निवडतात. बॉलिवूडमध्ये येणारी प्रत्येकच व्यक्ती ही यशस्वी होतेच असे नाही. अनेक कलाकार आपल्या अभिनयाला बालपणी सुरुवात करतात. यातील अनेक जण मोठे झाल्यावर कलाविश्वात पदार्पण करतात मात्र त्यांना यश मिळत नाही. बॉलिवूडमध्ये टिकून राहण्यासाठी कलाकारांना कालानुरूप त्यांच्या अभिनयामध्ये बदल करावा लागतो. प्रवाहासोबत पोहल्यामुळेच कलाकार या बेभरवशाच्या इंडस्ट्रीमध्ये तग धरू शकतात. अशाच अनेक पिढ्यांची आवड लक्षात घेत आपल्या अभिनयात काळानुरूप बदल करणारी अभिनेत्री म्हणजे अरुणा ईरानी. अरुणा यांनी आपल्या दमदार अभिनयाने बॉलिवूड मध्ये अनेक वर्षे अधिराज्य गाजवले आणि आजही त्या त्यांचे स्थान टिकवून आहेत. त्यांचे चित्रपट त्यांचे चाहते आजही आवर्जून पाहतात. आज (१८ ऑगस्ट) अरुणा यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्य जाणून घेऊया त्यांचा जीवन प्रवास.

मंडळी तुम्हाला माहीत आहे का? अरुणा इराणी यांनी आपल्या वयाच्या १५ व्या वर्षापासूनच अभिनयाला सुरुवात केली. त्यांचे वडील फरिदून ईराणी चाळीसच्या दशकात एक थेटर कंपनी चालवायचे. मदर इंडिया, आन, अंदाज अशा अनेक सुपरहीट चित्रपटांचे शूटिंग त्यांनी केले होते. यासाठी त्यांना दोन वेळा फिल्मफेअर बेस्ट सिनेमॅटोग्राफीने पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. अरुणा इराणी यांची आई शगुना या देखील एक सुंदर व यशस्वी अभिनेत्री होत्या. अरुणा यांना आठ भावंडे होती. त्यामुळे मधल्या काळात वडिलांचा व्यवसाय फार चांगला चालत नसल्याने. वयाच्या १५ व्या वर्षापासून त्यांनी चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली. (birthday special Aruna Irani know her cine journey and life story)

सुरुवातीला त्यांना काही लहान भूमिका साकारायला मिळाल्या. त्यातूनच अरुणा आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत करत होत्या. बराच काळ अरुणा यांनी कॅब्रे डान्सरच्या भूमिका निभावल्या. त्यांच्या आयुष्याला दिलीप कुमार यांनी कलाटणी दिली. १९६१ मध्ये आलेला “गंगा जमुना” या चित्रपटात अरुणा यांना एक बालकलाकाराची भूमिका मिळाली. यानंतर त्यांचे पूर्ण आयुष्यच बदलून गेले. आता चित्रपट करण्यासोबतच चांगले पैसेही कमावू लागल्या.

बॉलिवूडचे प्रसिद्ध खलनायक प्राण यांच्यामुळे अरुणा रडू लागल्या होत्या. त्याच झाले असे की, प्राण आपली भूमिका इतकी उत्तमपणे बजावत असत की अनेकांना ते आपल्या खऱ्या आयुष्यात देखील अशाच स्वभावाचे असतील असे वाटायचे. खलनायकाच्या भूमिकेत असलेले प्राण यांची भूमिका पाहून त्यांचा सर्वत्र एक वेगळाच दरारा निर्माण झाला होता. अरुणा यांच्या मनात देखील प्राण यांच्या विषयी फार भीती होती. त्या १८ वर्षांच्या असताना त्यांना प्राण यांच्यासोबत एक चित्रपट करण्याची संधी मिळाली. शूटिंगसाठी त्यांना बाहेरगावी जायचे होते. परंतु काही कारणास्तव विमान रद्द झाल्याने ते सर्व जणं एका हॉटेल मध्ये थांबले होते. प्राण त्यांच्या रूमकडे जात असताना त्यांनी अरुणा यांच्या खोलीचा दरवाजा उघडला आणि म्हणाले “तुझ्या खोलीचा दरवाजा आत मधून व्यवस्थित बंद कर. जर काही समस्या असेल तर मला निश्चितपणे आवाज दे” असे बोलून ते तेथून निघून गेले. त्यानंतर अरुणा यांना वाईट वाटले. त्या एवढ्या चांगल्या व्यक्ती बद्दल इतके दिवस वाईट विचार करत होत्या त्यामुळे अरुणा रडू लागल्या.

अरुणा यांनी आपल्या अभिनयाच्या कारकीर्दीत तब्बल ३०० हून जास्त चित्रपट केले आहेत. या दरम्यान त्यांनी ‘औलाद’, ‘हमजोली’, ‘नया जमाना’, ‘बॉम्बे टू गोवा’, ‘गरम मसाला’, ‘दो फूल’ या चित्रपटांत विनोदी अभिनेता महमूद यांच्या बरोबर भूमिका साकारल्या. या चित्रपटांमध्ये काम करत असताना दोघांमध्ये प्रेम संबंध असल्याच्या अनेक बातम्या जोर धरू लागल्या होत्या. परंतु एका मुलाखती मध्ये महमूद यांनी सांगितले की, “आम्ही दोघे खूप चांगले मित्र आहोत. आम्हला एकमेकांबरोबर रहायला आवडते आमच्या या नात्याला तुम्ही मैत्री किंवा आणखी काहीही बोलू शकता परंतु आमच्यात अजून तरी प्रेम नाही” .

अरुणा यांनी साल २००० नंतर चित्रपटसृष्टी सोबतच अभिनयाचा मोर्चा टीव्ही मालिकांकडे वळवला. त्यांनी ‘मेहंदी तेरे नाम की’,’कहानी घर-घर की’, ‘दिल तो हैप्पी’ आणि ‘झांसी की रानी’ अशा प्रसिध्द टीव्ही सिरीयल मध्ये काम केले. अरुण इराणी यांनी मराठीमध्ये देखील अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

वयाची चाळीशी ओलांडल्या नंतर अरुणा यांनी निर्माता कुक्कु कोहली यांच्याशी विवाह केला. त्यांनी “राजा बाबू”,” सुहाग”,”बॉबी” अशा अनेक सुपरहिट चित्रपटात कामे केली. जास्त करून सहाय्यक भूमिका आणि चरित्र भूमिका साकारलेल्या अरुणा यांनी आई न होण्याचा निर्णय घेतला आहे. आज त्या वयाच्या ७५ व्या वर्षी सुद्धा आपले आयुष्य हसत आणि सुखाने जगत आहे.

 

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘हे’ आहेत अफगाणिस्तान अन् तालिबानवर आधारित आतापर्यंतचे सर्वोत्तम चित्रपट; अजूनही पाहिले नसतील, तर एकदा पाहाच

-शर्मिला टागोरांनी बिकिनी घातल्यामुळे झाला होता मोठा वाद; फोटो पाहून टायगर पतौडींची होती ‘अशी’ प्रतिक्रिया

-प्रतिभावान अभिनेता असूनही रणवीर शोरीच्या वाट्याला आल्या कायम सहाय्यक भूमिका, पण वैयक्तिक आयुष्यामुळे मिळाली जास्त प्रसिद्धी

हे देखील वाचा