Tuesday, March 11, 2025
Home कॅलेंडर दिलीप जोशींची यशोगाथा I अवघ्या ५० रुपयांपासून सुरु केले करिअर, आज एका एपिसोडसाठी ‘जेठालाल’ घेतात बक्कळ पैसे

दिलीप जोशींची यशोगाथा I अवघ्या ५० रुपयांपासून सुरु केले करिअर, आज एका एपिसोडसाठी ‘जेठालाल’ घेतात बक्कळ पैसे

टेलिव्हिजन जगतात अनेक लोकप्रिय मालिका आहेत. या मालिकांमध्ये ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेने नेहमीच तिचे वर्चस्व सिद्ध केले आहे. गेल्या 12 वर्षापासून मालिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे या मालिकेतील कलाकार आणि त्यांची भूमिका. मालिकेत असणाऱ्या प्रत्येक पात्राची एक वेगळीच खासियत आहे.

मालिकेतील प्रत्येक भूमिकेने दर्शकांना आपलेसे केले आहे. यातील नेहमीच प्रत्येकाच्या ओठावर नाव असलेलं पात्र जेठालाल, बबिताजी आणि पोपटलाल. या कलाकारांची फॅन फॉलोविंग देखील खूप आहे. या मालिकेत आपल्या विनोदी अंदाजाने सर्वांना हसवणारे अभिनेते जेठालाल म्हणजेच दिलीप जोशी हे बुधवारी (२६ मे) आपला वाढदिवस साजरा करत आहेत. चला तर मग जाणून घेऊया त्यांच्या आयुष्यातील काही खास गोष्टी…

दिलीप जोशी यांचा जन्म 26 मे, 1968 मध्ये झाला होता. त्यांचे मूळ गाव हे चे गुजरातमधील पोरबंदरपासून 10 किमी पुढे बसेगोसा हे आहे. एका मुलाखतीत त्यांच्या करिअरबद्दल त्यांनी सांगितले होते की, त्यांनी एक बॅक स्टेज कलाकार म्हणून त्यांच्या करिअरला सुरूवात केली होती. त्यावेळी त्यांना प्रत्येक भूमिकेसाठी 50 रुपये मिळत होते. त्यांनी सांगितले की, त्यावेळी त्यांना कोणी काम देत नव्हते.

हेही वाचा – तुम्हाला माहितीये? दिलीप जोशींच्या आधी ‘या’ कलाकारांना ऑफर झालेली ‘जेठालाल’ची भूमिका, नकार देण्याचं कारण तर बघा

अवघ्या 50 रुपयांपासून करिअरला सुरुवात केलेला हा कलाकार आज ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेच्या एका एपिसोडसाठी दीड लाख रुपये एवढी फी घेतो. ते महिन्यातील 25 दिवस शूटिंग करतात. 25 दिवसाचा अंदाज लावला की, तर ते महिन्याभरात 36 लाख रुपये कमावतात. दिलीप जोशी यांनी वयाच्या 12‌ व्या वर्षी थिएटरमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. सुरुवातीला एका पुतळ्याची भूमिका केली होती. त्यांनी याबाबत एका मुलाखतीत सांगितले होते की, या नाटकात ते जवळपास 7-8 मिनिट पुतळा बनून उभे राहिले होते. त्यांनी दोन वेळा इंडियन नॅशनल थिएटर अवॉर्डमध्ये बेस्ट ऍक्टरचा अवॉर्ड जिंकला होता.

माध्यमांतील वृत्तांनुसार, दिलीप जोशी यांना महागड्या गाड्यांची देखील आवड आहे. त्यांच्याकडे 80 लाख रुपयांची ‘ऑडी क्यू 7’ ही कार आहे. यासोबतच त्यांना टोयोटा, इनोव्हा एमपीव्ही या गाड्या चालवायला आवडतात.

‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेत काम करण्याच्या एक वर्षभर आधी दिलीप जोशी यांच्याकडे कोणतेही काम नव्हते. त्यांनी स्वतः त्यांच्या एक मुलाखतीत सांगितले होते की, “टीव्ही आणि चित्रपटसृष्टीचे काही निश्चित नाहीये. तुम्ही कितीही मोठे स्टार असाल, पण तुम्ही तोपर्यंत टिकून राहाल जोपर्यंत तुमच्याकडे काम आहे.”

दिलीप जोशी यांच्या करिअरबद्दल बोलायचे झाल्यास, त्यांनी ‘हम आपके है कौन’, ‘फिर भी दिल है हिंदुस्तानी’, ‘हमराज’, ‘दिल है तुम्हारा’ यांसारख्या जवळपास 15 हिंदी चित्रपटात काम केले आहे. त्यांनी जयमाला यांच्याशी विवाह केला आहे. त्यांना ऋत्विक आणि नीयती हे दोन अपत्य आहेत.

अधिक वाचा

मुक्ता बर्वेचा आक्रमक अंदाज दाखवणार ‘वाय’, चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा

‘जेठालाल’ साकारण्यापूर्वी दिलीप जोशींनी ‘या’ चित्रपटात केलंय काम; प्रियांका चोप्राच्या चित्रपटाचाही आहे समावेश

कार्तिक आर्यनने त्याच्या लव्ह लाईफबद्दल केला खुलासा, ‘या’ को-स्टारला केलंय त्याने डेट

हे देखील वाचा