Tuesday, March 5, 2024

कंगनाला ‘या’ कारणामुळे वडिलांनी काढले होते घराबाहेर, अनेक वर्ष धरला होता तिच्याशी अबोला

बॉलिवूडमध्ये येऊन सतत नकार पचवत केवळ चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर प्रयत्न करताना अनेकदा माणूस थकतो, मात्र यातूनच पुन्हा उभे राहून आपले काम केल्यावरच यश मिळते. अभिनेत्री कंगना रणौत तिच्या प्रभावी अभिनयासाठी आणि विवादित वक्तव्यांसाठी ओळखली जाते. आज म्हणजेच गुरुवारी (23 मार्च)ला कंगना तिचा 35 वा वाढदिवस साजरा करत आहे. कंगनाला जरी अभिनेत्री व्हायचे असले, तरी तिच्या घरच्यांची अजिबात इच्छा नव्हती की तिने या क्षेत्रात यावे. तिच्या वडिलांनी तर तिला घराबाहेर देखील काढले होते. काय घडले होते नक्की जाणून घेऊया.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत ही तिच्या चित्रपटांव्यतिरिक्त तिच्या वक्तव्यामुळे देखील जोरदार चर्चेत असते. सोशल मीडियावर असो किंवा इतर कोणत्याही ठिकाणी असो सर्वत्र तिच्याच नावाची चर्चा चालू असते. समाजातील विविध घटनांवर ती तिचे नेहमीच मत व्यक्त करत असते. ही अभिनेत्री मूळची हिमाचलची आहे. तिचा जन्म हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्याजवळील सूरजपूर (भाबला) येथे झाला. तिच्या बाबत एक गोष्ट अनेकांना माहित नसेल की, तिचे वडील कितीतरी दिवस तिच्याशी बोलत नव्हते. चला तर जाणून घेऊया तिच्या आयुष्यातील तो किस्सा.

कंगना आज भलेही प्रसिद्ध अभिनेत्री असेल, पण तिचे वडील अमरदीप रणौत यांना तिने अभिनेत्री व्हावे असे वाटत नव्हते. त्यांना कंगनाला डॉक्टर बनवायचे होते. त्याने तिला चंदीगडच्या डीएव्ही स्कूलमध्ये प्रवेश मिळवून दिला, पण कंगनाला वैद्यकीय पुस्तके अजिबात आवडत नव्हती. त्यानंतर कंगना शाळेच्या कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत असे. तिला रॅम्पवर चालण्याची आवड होती. शाळेतील फ्रेशर्सची रात्र असो किंवा निरोप, ती रॅम्पवर चालायची. शालेय जीवनापासून तिला मॉडेलिंगची आवड आहे.

माध्यमातील वृत्तानुसार, कंगना जेव्हा शाळेत होती तेव्हापासूनच मॉडेलिंगमध्ये तिची आवड वाढू लागली. तिने शाळेत जाणे बंद केले आणि वसतिगृह सोडले आणि पीजीमध्ये राहू लागली. ही बाब तिचे वडील अमरदीप यांना कळताच त्यांनी कंगनाला बेदम मारहाण केली.

जेव्हा कंगनाने तिच्या वडिलांना सांगितले की, तिला अभिनयात जायचे आहे, तेव्हा तिच्या वडिलांनी रागाने तिला घर सोडण्यास सांगितले. त्यानंतर कंगना कोणत्याही आर्थिक मदतीशिवाय घराबाहेर पडली होती. कंगनाचे वडील तिच्याशी वर्षानुवर्षे बोलले नाहीत. कंगनाने ‘गँगस्टर’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिला बॉलिवूडमध्ये आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. ती आज ज्या स्थानावर आहे त्यामागे अनेक वर्षांची मेहनत आहे. तिने तिच्या आता पर्यंतच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले आहे. तिची प्रत्येक भूमिका प्रेक्षकांना भावली आहे. (birthday special kangana ranaut father did not talk to her for years know what was the reason 2)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सततच्या धमक्यांना घाबरत नाही सलमान खान; म्हणाला, ‘जे घडायचे आहे, ते होईल’

माधुरीने आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा केला वाढदिवस; म्हणाली, “निस्वार्थी निखळ मुलांमध्ये…”

हे देखील वाचा