Tuesday, March 5, 2024

सततच्या धमक्यांना घाबरत नाही सलमान खान; म्हणाला, ‘जे घडायचे आहे, ते होईल’

बॉलिवूड अभिनेता सलमान खानला सध्या जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत, त्यामुळे त्यांचे वडील सलीम खान यांची झाेप उडाली आहे. सलमान खानला धमक्या मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांनीही सुरक्षा वाढवली आहे. यापूर्वी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने दबंग खानला माफी मागण्यास सांगितले होते. सलमान खानने असे केले नाही, तर त्याचे परिणाम भोगावे लागतील असेही तो म्हणाला होता. मात्र, यावर सलमान खानने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही आणि माफीही मागितली नाही.

अशात नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांनी सुपरस्टार सलमान खानच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली आहे. कारण, त्याला ईमेलद्वारे धमकी देण्यात आली आहे. माध्यमातील वृत्तांनुसार, सलमान खानच्या एका जवळच्या मित्राचे म्हणणे आहे की, ‘अभिनेता ही धमकी खूप हलक्यात घेत आहे किंवा असे असू शकते की, तो फक्त अशा प्रकारे वागत आहे. कारण की, त्याच्या कुटुंबातील काेणत्याही सदस्यांना त्रास हाेऊ नये.’ दुसरीकडे, सलमान खान याचे वडिल देखील जितके शांत दिसतात तितके नाहीत. या धमकीनंतर सलीम खान यांची झोप उडाली आहे. हे कुटुंबातील सर्वांनाच माहीत आहे.

अभिनेत्याच्या मित्राने खुलासा केला आहे की, सलमान ही सुरक्षा वाढवण्याच्या विरोधात होता. कारण, तो म्हणतो की, ‘तो यावर जितके जास्त लक्ष देईल तितके लक्ष वेधून घेतल्या जाईल आणि गुंडगिरी करणार्‍याला वाटेल की, तो यशस्वी होत आहे.’ तो पुढे म्हणाला की, ‘सलमानचा नियतीवर विश्वास आहे. जे व्हायचे ते होईल.’ या धमकीच्या पत्र आणि ईमेलनंतर अभिनेत्याने सध्या घराबाहेर पडणे बंद केले आहे.

सलमान खान लवकरच ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटात दिसणार आहे. यंदाच्या ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात अभिनेत्यासाेबत पूजा हेगडेही दिसणार आहे. त्याचवेळी शहनाज गिलही या चित्रपटातून डेब्यू करणार आहे.(bollywood actor salim khan getting scared because of salman khan death threaten by gangster lawrence bishnoi )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
आयडी न दाखवता करण जोहरने विमानतळावर केला प्रवेश, सुरक्षा रक्षकाने रोखल्यानंतर ट्रोल झाला दिग्दर्शक

‘हिंदुत्व खोट्यावर आधारित’ हिंदू धर्माबद्दल वादग्रस्त ट्वीट केल्यामुळे ‘या’ लोकप्रिय अभिनेत्याला अटक

हे देखील वाचा