Saturday, June 29, 2024

जाणून घ्या प्रतिभावान अभिनेते अनुपम खेर यांची एकूण संपत्ती आणि महिन्यांची कमाई

बॉलिवूडमधील अतिशय प्रतिभावान अभिनेते असलेले अनुपम खेर आज (7 मार्च) रोजी त्यांचा 68 वा वाढदिवस साजरा करत आहे. अनुपम यांनी त्यांच्या अतिशय जिवंत आणि उत्कृष्ट अभिनयातून अमाप लोकप्रियता मिळवली. कोणतीही भूमिका अगदी लीलया करण्याचे त्यांचे कसब खूपच कमी लोकांना अवगत असते. खलनायकी भूमिकांपासून ते विनोदी भूमिकांपर्यंत प्रत्येक भूमिका अनुपम खेर यांनी तितक्याच ताकदीने निभावली. त्यांनी अतिशय मेहनतीने आणि संघर्षाने त्यांचे करिअर घडवले. कोणीही या क्षेत्रात नसूनही त्यांनी स्वतःच्या हिमतीवर स्वतःचे विश्व निर्माण केले. प्रतयेक चित्रपटासोबत त्यांनी स्वतःला घडवले. अनुपम हे 68 वर्षांचे असून ते या यासाठी त्यांच्या उत्तम फिटनेस जपत आहेत. आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला त्यांच्या एकूण संपत्तीबद्दल सांगणार आहोत.

एका मोठ्या रिपोर्टनुसार अनुपम खेर यांची ऐकून संपत्ती जवळपास 400 कोटींची आहे. त्यांची एका महिन्याची कमाई जवळपास 3 कोटी इतकी असून वर्षाची सरासरी 30 कोटी एवढी आहे. मागील काही वर्षांमध्ये अनुपम खेर यांच्या उत्पन्नामध्ये 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. अनुपम खेर हे अभिनयासोबतच निर्माते, दिग्दर्शक असून, इतरही अनेक व्यवसायांमध्ये सक्रिय असल्याने इथूनही त्यांची चांगली कमाई होते. एवढा पैसा कमावल्यानंतर ते दान देखील भरपूर करतात, सोबतच बक्कळ टॅक्स देखील देतात.

अनुपम खेर यांचे मुंबईमध्ये दोन बंगले असून, एक अंधेरी आणि एक जुहू ठिकाणी आहे, जायची किंमत ५ कोटींच्या घरात आहे. यासोबतच देशात विविध ठिकाणी त्यांनी रियल एस्टेटमध्ये गुंतवणूक केली आहे. याशिवाय अनुपम खेर यांच्याकडे अनेक आलिशान गाड्यांचे कलेक्शन आहे, ज्यात बीएमडब्लू, स्कॉरपियो आदी अनेक मोठ्या गाड्यांचा समावेश आहे,

अनुपम खेर यांच्या कामाबद्दल सांगायचे झाल्यास त्यांनी 1982 साली ‘आगमन’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी ‘सारांश’ सिनेमात वृद्ध व्यक्तीची भूमिका साकारली होती. सुरुवातील संघर्ष केल्यानंतर त्यांना हळूहळू या क्षेत्रात नाव मिळत गेले. आतापर्यंत अनुपम खेर यांनी 500 पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. बॉलिवूडसोबतच अनुपम खेर यांनी अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. निर्माता म्हणून अनुपम खेर यांनी ‘बरीवाली’, ‘मैंने गांधी को नहीं मारा’, ‘तेरे संग’, ‘रांची डायरीज’ आदी चित्रपटांची निर्मिती केली. त्यांना पद्मश्री,पद्मभूषण पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले आहे. (birthday special know anupam kher net worth)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘तुम्ही लोक निर्लज्ज आहात’, म्हणणाऱ्यांवर भडकली रवीना; म्हणाली, ‘माझे शारीरिक शोषण…’

एमसी स्टॅनच्या कॉन्सर्टमधे मित्राला सपोर्ट करण्यासाठी पोहचली ‘मंडळी’, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

हे देखील वाचा