Friday, December 8, 2023

‘तुम्ही लोक निर्लज्ज आहात’, म्हणणाऱ्यांवर भडकली रवीना; म्हणाली, ‘माझे शारीरिक शोषण…’

रवीना टंडन बॉलीवूडमधील अशा अभिनेत्रींपैकी एक आहे, जी तिच्या स्पष्ट वक्तव्यासाठी ओळखली जाते. अशात नुकतेच रवीनाने तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत असा खुलासा केला आहे की, कुणालाही त्यावर विश्वास बसणे कठीण आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर ती शारीरिक शोषणाला बळी पडल्याचे सांगितले आहे. या खुलाशानंतर अभिनेत्रीच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे.

खरे तर, रवीना टंडन (raveena tandon) मेट्रोसाठी जंगल कापल्याच्या विरोधात आहे. तिला वाटते की, मेट्रो 3 कारशेडसाठी हिरवे जंगल ताेडणे चुकीचे आहे. अशात या प्रकरणावर एका व्यक्तीने रवीना टंडनवर प्रश्न केला. त्या व्यक्तीने काही दिवसांपूर्वी मुंबईच्या लोकल ट्रेनचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की. ट्रेन प्रवाशांनी खचाखच भरलेली आहे आणि काही लोक ट्रेनच्या गेटवर लटकले आहेत. यादरम्यान ट्रेन वेगाने धावत असून ट्रेनमधील एक मुलगा चालत्या ट्रेनमधून पडला.

व्हिडीओ शेअर करताना एका व्यक्तीने रवीना टंडनला विचारले, “नमस्ते रवीना टंडन, तुम्ही शेवटच्या वेळी मेट्रोला विरोध करण्यासाठी असा प्रवास कधी केला होता? तुम्ही लोक निर्लज्ज आहात.” यावर रवीनाने लिहिले की, “1991 पर्यंत मी असा प्रवास केला आहे. एक मुलगी असल्याने, तुझ्यासारख्या एका अज्ञात माणसाने माझे देखील शारीरिक शोषण केले. काम सुरू करण्यापूर्वी मला सक्सेस मिळाले आणि मी माझी पहिली कारही घेतली. नागपूरचे चे आहात, तुमचे शहर हिरवेगार आहे, कोणाच्या सक्सेसचा किंवा इनकमचा हेवा करू नका.”

रवीना टंडनने पुढे लिहिले की, “किशोरवयात बसमध्ये प्रवास केला, विनयभंगही झाला, ते सर्व झाले ज्यातून बहुतेक महिला जातात. त्यानंतर 1992 मध्ये मला माझी पहिली कार मिळाली.” अश्याप्रकरे अभिनेत्रीने ट्राेलर्सला उत्तर दिले. ( bollywood actress raveena tandon talkes about her teenage days when she was molested many times travelling in buses)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
…म्हणून करिना कपूरला होळी साजरी करायला आवडत नाही, आजोबा राज कपूर यांच्याशी संबंधित आहे किस्सा

धक्कादायक! ‘या’ अभिनेत्रींच्या वडिलांनीच केले होते तिचे लैंगिक शोषण, स्वतःच केला मोठा खुलासा

हे देखील वाचा