Saturday, July 27, 2024

गरिबीतून आलेल्या भारती सिंगने अत्यंत मेहनतीने बनवलीय इंडस्ट्रीमध्ये जागा; जाणून घेऊया तिचा डोळे पाणावणारा जीवनप्रवास

कॉमेडियन भारती सिंग ही एक अशी अभिनेत्री आहे, जेव्हा ती मंचावर येते तेव्हा कोणीही आपले हसू कंट्रोल करू शकत नाही. यामुळेच सगळे तिला ‘कॉमेडी क्वीन’ असे संबोधतात. भारती ही तिचा एक वेगळाच अंदाज आणि जबरदस्त कॉमिक टायमिंग यामुळे प्रत्येकाच्या मनावर अधिराज्य गाजवत असते. प्रेक्षकांना नेहमीच हास्याच्या महासागरात सोडणाऱ्या भारती सिंगचा आज वाढदिवस आहे. आज भारती तिचा 39वा वाढदिवस साजरा करत आहे. भारती सिंगने अनेक संकटांचा सामना करत इंडस्ट्रीमध्ये तिची जागा निर्माण केली आहे. चला तर तिच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया तिच्या आयुष्यातील या काही गोष्टी.

नेहमीच प्रेक्षकांना हसवणाऱ्या भारती सिंगची कहाणी खूप भावनिक आहे. तिने जेव्हा केव्हा लोकांसोबत तिची कहाणी शेअर केली आहे, तेव्हा सगळ्यांचेच डोळे पाणावले आहेत. भारती सिंगचा जन्म 3 जुलै 1986 रोजी अमृतसरमध्ये झाला होता. तिने आयुष्यात अत्यंत वाईट दिवस पाहिले आहेत. तिने गरिबीतून दिवस काढले आहेत. या गोष्टीचा खुलासा भारती सिंगने अनेक शोमध्ये केला आहे. तिने सांगितले होते की, या गरिबीमध्ये तिची आई इतकी हैराण झाली होती की, ती तिला गर्भातच मारणार होती.

मुलीचा गर्भ पाडण्यासाठी तिच्या आईने काही गोळ्या देखील खाली होत्या. पण त्यावेळी भारती सिंगचा जन्म झाला. तिच्या आईने खूप प्रेमाने तिचे पालन-पोषण केले. तिची प्रत्येक गरज तिच्या आईने पूर्ण केली. अत्यंत गरीब परिस्थितीत तिने तिचे बालपण घालवले आहे. जेव्हा ती 2 वर्षांची होती, तेव्हा तिचे वडिल स्वर्गवासी झाले.

वडीलांच्या निधनानंतर घराची सगळी जबाबदारी भारतीच्या आईच्या खांद्यावर आली. त्यावेळी अत्यंत मेहनतीने तिच्या आईने एका फॅक्टरीमध्ये काम सुरू केले. भारती सिंगने सांगितले की, घरातल्या सगळ्या टेन्शनपासून मुक्तता मिळण्यासाठी ती एनसीसी कॅम्पला जात होती.

मोठी झाल्यावर पैशांसाठी भारती सिंगने अनेक ठिकाणी ऑडिशन देण्यास सुरुवात केली. त्याच वेळी तिची भेट कॉमेडियन सुदेश लहरीसोबत झाली. त्यांनी भारती सिंगला एनसीसी कॅम्प दरम्यान ॲक्टिंग करताना पाहिले होते. तेव्हा ते खूप प्रभावित झाले होते. त्यांनी भारती सिंगला एक रोल ऑफर केला आणि तिथूनच भारती सिंगचे दिवस पालटायला सुरुवात झाली. त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. ती तिच्या आयुष्यात केवळ प्रगतीचं करत गेली.

भारती सिंगने 2017 साली हर्ष लिंबाचीयासोबत लग्न केले आहे. हर्ष देखील एक कॉमेडियन आहे. त्या दोघांचे प्रेम, त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडते. ते अनेक रियॅलिटी शो होस्ट करताना दिसतात.

मागील काही दिवसांपूर्वी भारती सिंग ड्रग्ज प्रकरणामुळे खूप चर्चेत आली होती. दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर ड्रग्ज खुलासा झाला. त्यावेळी नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो इंडस्ट्रीमध्ये ड्रग्ज प्रकरणात खूप लक्ष देत होती. त्यावेळी 21नोव्हेंबरला भारती सिंगला अटक झाली होती. परंतु 3 दिवसांनंतर तिला जामीन मिळाला होता.  (Birthday special: let’s know life journey of comedian Bharati singh)

हे देखील वाचा