Tuesday, May 28, 2024

अभिनेत्री शिबानी दांडेकरच्या बहिणीने उडवली चाहत्यांची झोप; बिकिनीतील फोटो व्हायरल

मराठमोळी अभिनेत्री आणि मॉडेल म्हणुन शिबानी दांडेकरला ओळखले जाते. शिबानीने तिच्या करिअरची सुरूवात एका अमेरिकन टीव्हीची सूत्रसंचालिका म्हणून केली होती. बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तरने शिबानी दांडेकरसोबत लग्न केले आहे. शिबानीचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. तिची बहिण अनुषा दांडेकर सुध्दा नेहमीच चर्चेत असते.

प्रसिद्ध व्हिडिओ जॉकी, टीव्ही व्यक्तिमत्व आणि ‘बिग बॉस 15 मधील करण कुंद्राची एक्स गर्लफ्रेंड अनुषा दांडेकरने (Anusha Dandekar) इंटरनेटचे तापमान वाढवले आहे. तिने इंस्टाग्रामवर तिचे बिकिनी फोटो शेअर केले आहे. ती सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. शिबानीप्रमाणेच तिची धाकटी बहीण अनुषा दांडेकर हिचीही चांगलाच फॅन फॉलोइंग आहे.

नुकतेच अनुषा दांडेकरने तिचे काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. तिचे फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत. अनुषाचे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. अभिनेत्री अनुषाच्या या फोटोंवर चाहते प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. फोटोमधये अनुषा दांडेकरचा आतापर्यंतचा सर्वात बोल्ड अवतार पाहायला मिळत आहे.

अनुषा अनेकदा तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील झलक सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. मग ती सुट्टीतील असो किंवा तिच्या कुटुंबीयांसह आणि मित्रांसोबत पार्टी करत असो, अनुषा तिच्या आयुष्यातील झलक चाहत्यांसह शेअर करण्याताना कोणताही विचार करत नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Anusha Dandekar (@vjanusha)

अनुषा दांडेकरने समुद्र किनाऱ्यावरील काही फोटो शेअर केली आहेत. या फोटोंमध्ये ती क्रीम कलरच्या बिकिनीमध्ये पोज देताना दिसत आहे. फोटो शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, ” कधी कधी आपण विसरतो की आनंदात जगणे ही आपली आवड आहे. आपण ते प्रत्येक वेळी निवडू शकतो”

तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी खूप साऱ्या कमेंट केल्या आहेत. शाॅर्ट कपडे परिधान केल्यामुळे काही लोक तिला ट्रोल करतानाही दिसत आहेत. एका युजरने लिहिले की, ‘अनुषा, तू सर्वांना मारण्यची परवानगी घेतला आहेस का? दुसऱ्याने लिहिले की, ‘तू खूप सुंदर दिसत आहेस.’ याशिवाय चाहते हार्ट इमोजी शेअर करताना दिसत आहेत. (Actress Shibani Dandekar’s sister Anusha Dandekar’s photos are viral on social media)

अधिक वाचा- 
‘खतरों के खिलाडी 13’च्या सेटवर शिव ठाकरेला झाली दुखापत, बोटाला द्यावे लागले ‘इकते’ टाके
ऑफ शोल्डर पांढऱ्या ड्रेसमध्ये खुललं मिथिलाचं सौंदर्य

हे देखील वाचा