मुंबई एक स्वप्ननगरी आहे. अनेकजण आपलं कलाकार बनण्याचा स्वप्न उराशी बाळगून सगळ्या जगाचा विरोध पत्करून मुंबईकडे रवाना होत असतात. ही मुंबईच असते जी माणसांच्या अत्यंत कठीण काळापासून ते एक सुपरस्टार होईपर्यंत साक्ष देत असते. असे अनेक कलाकार आहेत, ज्यांना मुंबईने मोठे होताना पाहिले आहेत. यातीलच एक कलाकार म्हणजे प्रवीण डबास. तो देखील असचं एक स्वप्न उराशी बाळगून मुंबईला आला होता. ज्याने चित्रपटात काम करून खूप यश मिळवले होते, आज भलेही प्रवीण चित्रपटापासून काही प्रमाणात दूर आहे तरी आजही प्रेक्षकांच्या मनात त्याची जागा कायम आहे. आज तो त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. त्याचा जन्म १२ जुलै १९७४ मध्ये दिल्ली येथे झाला होता. चला जाणून घेऊया त्याच्याबाबत काही खास गोष्टी. (Birthday special : let’s know some unknown thing about actor pravin dabas)
प्रवीणने त्याच्या करिअरची सुरुवात एक मॉडेल म्हणून केली होती. त्याने १९९९ साली ‘दिल्लगी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात त्याच्यासोबत सनी देओल आणि बॉबी देओल मुख्य भूमिकेत होते. त्यानंतर त्याने ‘खोसला का घोसला’ आणि ‘मैंने गांधी को नहीं मारा’ यांसारख्या चित्रपटात काम केले. परंतु या चित्रपटातून त्याला त्याच्या हक्काची ओळख नाही मिळाली. तसेच त्याने ‘जलपरी’, ‘सिर्फ’, ‘रागिणी एमएमएस २’ आणि ‘तपिश’ यांसारख्या चित्रपटातही काम केले आहे.
माध्यमातील वृत्तानुसार, प्रवीणने दिग्दर्शनामध्ये देखील त्याचा हातभार लावला आहे. त्याने ‘सही धंधे, गलत बंदे’ या चित्रपटातून दिग्दर्शनाच्या दुनियेत पाऊल ठेवले. परंतु इथे देखील त्याला मनासारखे यश नाही मिळाले. परंतु खास गोष्ट म्हणजे प्रवीणला अभिनय, दिग्दर्शन, मॉडेलिंग याव्यतिरिक्त स्कुबा डायव्हिंग आणि फोटोग्राफीची देखील आवड आहे. तो एक कुशल अंडर वॉटर फोटोग्राफर आणि स्कुबा ड्रायव्हर आहे.
तो आज प्रीती झांगियानीसोबत त्याच्या वैवाहिक आयुष्यात एकदम खुश आहे. कामाबद्दल बोलायचे झाल्यास तो केन घोष यांनी दिग्दर्शन केलेल्या ‘स्टेट ऑफ सिथ : टेंपल अटॅक’ या चित्रपटात दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-