हटके शब्द आणि उडत्या चालीमुळे भोजपुरी गाणे नेहमीच त्यांची लोकप्रियता मिळ्वण्यात यशस्वी होतात. भोजपुरी संगीताने त्यांचे प्रेक्षक नेहमीच जपले आहेत. प्रेक्षकांच्या आवडी- निवडी लक्षात घेऊन भोजपुरीमध्ये गाणी तयार होतात. अगदी बोटावर मोजण्याइतके गाणे सोडले, तर सर्वच गाणी तुफान गाजतात. या हिट गाण्यांवर प्रेक्षकही त्यांचे नवनवीन व्हिडिओ बनवतात आणि सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. यात फॅन्सससोबतच कलाकारांचा देखील समावेश असतो. आता या गाण्यात एक नवीन व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड गाजताना दिसत आहे.
सुपरस्टार खेसारी लाल यादव आणि भोजपुरीमधील लोकप्रिय गायिका अंतरा सिंग प्रियांका यांच्या ‘देख गारी मत द’ या गाण्यावर भोजपुरी इंडस्ट्रीतील सुपरहिट डान्सर आणि अभिनेत्री असलेल्या राणीने धमाकेदार डान्स केला आहे. त्याच्या या गाण्यावरील हा डान्स व्हिडिओ सध्या खूप गाजत आहे.
ऐश्वर्या शर्मा दिग्दर्शित हा डान्स व्हिडिओ स्पीड रेकॉर्ड्सच्या भोजपुरी यूट्यूब चॅनलवर ११ जुलै रोजी प्रदर्शित करण्यात आला. ‘देख गारी मत द’ या गाण्यावर राणीचा घायाळ करणारा डान्स आणि दिलखेचक अदा सर्वांनाच आवडत आहेत. अतिशय कमी काळात या व्हिडिओने भरपूर लाईक्स आणि कमेंट्स मिळवल्या आहेत. या गाण्यात राणीने पांढऱ्या रंगाचा स्लीव्हलेस टॉप घातला असून, त्यावर निळ्या रंगाचे शॉर्ट्स घातले आहे. तिचा हा हॉट लूक आणि मादक अदा पाहून तिच्या लोकप्रियतेत वाढ होत आहे.
भोजपुरीमध्ये खेसारी लाल यादवचे प्रत्येक गाणे हिट होणारच हे सर्वश्रुत असते. त्याच्या फॅन्सला देखील त्याच्या नवीन गाण्याची खूपच उत्सुकता असते. ‘देख गारी मत द’ हे त्याचे गाणे सप्टेंबर २०२० ला प्रदर्शित करण्यात आले होते. खेसारी लाल यादव आणि सुदीक्षा झा यांच्या या गाण्याने प्रदर्शित होताच इंटरनेटवर धमाल केली होती. पॉप सॉन्ग स्टाईलमधील हे गाणे शाम देहाती यांनी लिहिले होते, तर ओम झा यांनी या गाण्याला संगीत दिले आहे. या गाण्याला आतापर्यंत कोट्यवधी व्ह्यूज मिळाले आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
बापरे बाप! ‘लूई विटॉन’ ब्रँडच्या महागड्या ड्रेसमध्ये दिसली सोनम कपूर; किंमत वाचून होतील बत्त्या गुल
-ऋचा चड्डाशी लग्न न करण्याबाबत अली फजलने सांगितले ‘मोठे’ कारण; म्हणाला, ‘आम्ही आधी पैसे…’