पती राज कौशल यांच्या निधनानंतर पहिल्यांदाच घराबाहेर दिसली मंदिरा बेदी, आईसोबतचा व्हिडिओ तुफान व्हायरल


अभिनेत्री मंदिरा बेदीच्या पतीचे राज कौशल यांचे काही दिवसांपूर्वीच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. अचानक कोसळलेल्या या दुःखाच्या डोंगरातून मार्ग काढताना मंदिरा अक्षरशः कोलमडून पडली होती. तिने तिचे हे दुःख शब्दांविना सोशल मीडियावर व्यक्त केले होते. तिच्या दुःखाला जरी शब्द नव्हते, तरीही तिचे दुःख आणि त्याची तीव्रता किती आहे, याचा अंदाज तिने शेअर केलेल्या पोस्टवरून सर्वांनाच आला. पतीच्या निधनानंतर काही काळ स्वतःला मीडियापासून लोकांपासून दूर ठेवणारी मंदिरा नुकतीच घराबाहेर दिसली.

मागील महिन्यात ३० जूनला मंदिराच्या पतीचे राज कौशल यांचे निधन झाल्यानंतर आता मंदिरा स्वतःला सावरताना आणि या दुःखातून स्वतःला बाहेर काढताना दिसत आहे. मंदिराचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. यात ती तिच्या आईसोबत दिसत असून, त्या वॉक करत आहेत. कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करत या मायलेकी मुंबईच्या रस्त्यांवर फिरताना दिसल्या आहेत.

हा व्हिडिओ इंस्टाग्रामवरील व्हायरल भयानी नावाच्या अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये मंदिरा तिच्या आईसोबत वॉक करता करता चर्चा देखील करत आहे. कोणाला कोणतीच प्रतिक्रिया न देता मंदिरा आणि तिची आई वॉक करत पुढे निघून जाताना दिसल्या. या व्हिडिओवर आता नेटकऱ्यांच्या अनेक कमेंट्स येत आहेत.

राज यांच्या आकस्मिक निधनामुळे मंदिरासोबतच त्यांच्या मित्रपरिवाराला, इंडस्ट्रीला आणि फॅन्सला मोठा धक्का बसला होता. राज यांच्या निधनानंतर मंदिराने तिचे आणि राजचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला होता. राज आणि मंदिरा जवळपास २५ वर्ष सोबत होते. त्यामुळे साहजिकच मंदिराला या दुःखातून सावरायला काही काळ नक्कीच लागेल. यासाठी तिने आता प्रयत्न करायलाही सुरुवात केली आहे.

अनेक वर्षांच्या रिलेशनशिपनंतर अभिनेत्री मंदिरा बेदी आणि राज कौशल यांनी १९९९ मध्ये लग्न केले होते. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी असून, त्यांनी मुलीला दत्तक घेतले आहे. राज हे इंडस्ट्रीमधील निर्माता, दिग्दर्शक असण्यासोबतच एक मोठे आणि प्रसिद्ध व्यक्तिमत्व होते. त्यांनी अनेक जाहिराती आणि सिनेमांचे दिग्दर्शन केले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

बोल्ड एँड ब्युटीफुल! बीचवरील रेतीने माखलेली दिसली दिशा पटानी; बिकिनीतील बोल्ड फोटोचा इंटरनेटवर बोलबाला

बापरे बाप! ‘लूई विटॉन’ ब्रँडच्या महागड्या ड्रेसमध्ये दिसली सोनम कपूर; किंमत वाचून होतील बत्त्या गुल

-ऋचा चड्डाशी लग्न न करण्याबाबत अली फजलने सांगितले ‘मोठे’ कारण; म्हणाला, ‘आम्ही आधी पैसे…’


Leave A Reply

Your email address will not be published.