Friday, March 29, 2024

पहिला चित्रपट सुपरहिट, तरीही अभिनयापासून दूर आहे अभिनेता; वाचा कुमार गौरवबद्दल कधीही न ऐकलेल्या गोष्टी

भारतीय चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार राजेंद्र कुमार यांच्या घरी ११ जुलै १९६० रोजी एका लहानग्याचे स्वागत झाले. तो लहान मुलगा म्हणजे कुमार गौरव. कुमार गौरव यांचे बालपणीचे नाव मनोज तुली हे होते. कुमार गौरव देखील त्यांचे वडील राजेंद्र कुमार यांच्या पावलावर पाऊल ठेऊन चित्रपटातसृष्टीमध्ये आले, पण ते त्यांच्या वडीलांप्रमाणे नाव नाही कमावू शकले. परंतु कुमार गौरव यांचा ‘लव्ह स्टोरी’ हा पहिला चित्रपट आजही बॉलिवूडमधील सर्वात सुंदर कहाणी असलेला चित्रपट म्हणून ओळखला जातो. त्यांच्या पहिल्या चित्रपटाचे निर्माते हे त्यांचे वडील होते. तसेच ते देखील या चित्रपटात दिसले होते. या एकाच चित्रपटाने गौरव कुमार यांना एवढे यश मिळाले, जे मिळवण्यासाठी कलाकारांना कित्येक वर्ष वाट बघावी लागते. त्यावेळी ते टॉप ५ कलाकाराच्या यादीत होते, पण त्यांचे करिअर काही चांगले नाही झाले. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्यांच्या आयुष्यातील काही खास गोष्टी. (Birthday special : let’s know the career journey of actor Gaurav Kumar)

कुमार गौरव यांचा पहिला चित्रपट सुपरहिट झाल्यानंतर, ते टॉप स्टारच्या लाईनमध्ये होते. या चित्रपटात केवळ त्यांच्या अभिनयाचे नाही तर त्यांच्या स्टाइलचे देखील खूप कौतुक झाले होते. अनेकांनी त्यांची स्टाईल कॉपी देखील केली होती. भलेही ते चित्रपटसृष्टीपासून लांब आहेत. पण आज ते करोडोच्या संपत्तीचे मालक आहेत.

पहिला चित्रपट सुपरहिट झाल्यानंतर त्यांना अनेक दिवस चित्रपट मिळाला नाही. एक दिवस असा आला की, ते अचानक चित्रपट सृष्टीपासून लांब झाले. त्यांच्या वडिलांचा स्टारडम एवढा होता की, त्यांना ‘जुबली कुमार’ या नावाने ओळखले जात होते. त्यांचा मुलगा अचानक गायब झाल्याने अनेक चर्चा रंगल्या होत्या.

चित्रपटसृष्टीमध्ये सहसा स्टारडम गेल्यानंतर कलाकारांची अवस्था खराब होते. पण कुमार गौरव यांनी या सगळ्याचा परिणाम त्याच्यावर होऊ दिला नाही. ते त्यांच्या वडीलांप्रमाणे सुपरस्टार नाही झाले, पण त्यांनी त्यांची एक वेगळीच ओळख निर्माण केली होती.

कुमार गौरव यांचे नाणे चित्रपटसृष्टीमध्ये खणखणीत नाही वाजले, पण त्यांना कधीच कोणत्या गोष्टीचे वाईट नाही वाटले. आज ते खूप मोठे व्यावसायिक आहेत. मालदीवमध्ये त्यांचा ट्रॅव्हल व्यवसाय आहे. यासोबतच त्यांचे काही कन्स्ट्रक्शन देखील आहेत. त्यांचे आयुष्य एकदम मजेत चालू आहे आणि त्यांना चित्रपटसृष्टीपासून लांब गेल्याचे अजिबात दुःख नाहीये. या गोष्टीचा उल्लेख त्यांनी एकदा त्यांच्या मुलाखतीत केला होता. त्यांनी त्यांच्या मुलाखतीत सांगितले होते की, “मला कोणत्याही गोष्टीचे दुःख नाहीये. तुम्ही काही गमावता तर काही कमावता. हेच तर व्यावसायिक आयुष्य आहे.”

कुमार गौरव यांचे अभिनेता संजय दत्त याच्याशी देखील एक चांगले नाते आहे. संजय दत्त आणि गौरव कुमार हे नात्याने दाजी मेव्हणे आहेत.

ऐंशीच्या दशकात जेव्हा संजय दत्तला व्यसन लागले होते आणि त्याला अटक केले होते, तेव्हा त्याच्या करिअरला उभारी देण्यासाठी त्यांनी ‘नाम’ हा चित्रपट बनवला होता. या चित्रपटाने त्याने पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये जोरदार एंट्री केली. त्याचा हा चित्रपट चांगलाच सुपरहिट झाला होता. या चित्रपटाने त्याला खूप ओळख मिळाली होती. त्यानंतर दोन वर्षांनी कुमार गौरव यांनी संजय दत्तची बहिण नम्रता दत्तसोबत लग्न केले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-करीना आणि सैफच्या दुसऱ्या मुलाचे नाव झाले फायनल; आजोबा रणधीर कपूर यांनी दिली माहिती

-जोहरा सेहगल यांना बिग बी म्हणाले होते, ‘१०० वर्षांची मुलगी’; तर मजेदार होती त्यांची शेवटची ईच्छा

-संस्कृती बालगुडेने घोड्यासोबत केलं फोटोशूट; हटके फोटोंना मिळतोय चाहत्यांचा प्रतिसाद

हे देखील वाचा