Tuesday, May 28, 2024

‘ती आठवड्यातून तीन वेळा…’, लेकीच्या कॉस्मेटिक सर्जरीच्या उलटसुलट चर्चांवर स्पष्टच बोलली काजोल

बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांना लाईमलाईटमध्ये येण्यासाठी काही खास गोष्टी कराव्या लागत नाहीत. ते घराबाहेर पडले, तरी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतात. त्यांनी पॅपाराजींसोबत संवाद साधला तरीही त्यांच्याविषयी चर्चा सुरू होतात. मात्र, जेव्हा त्यांच्या मुलांविषयी ट्रोलर्सनी अपशब्द काढला, तर त्यांची आगपाखड झाल्याशिवाय राहत नाही. असेच काहीसे बॉलिवूड अभिनेत्रीबद्दल झाले. अभिनेता अजय देवगण आणि काजोलची मुलगी न्यासा देवगण हिच्या लूकवरून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले. यावर काजोलने आगपाखड केली.

अजय देवगण आणि काजोल यांची मुलगी न्यासा देवगण (Ajay Devgan And Kajol Daughter Nysa Devgan) हिने अद्याप सिनेसृष्टीत पाऊल ठेवले नाहीये. मात्र, तरीही ती नेहमीच चर्चेत असते. यामध्ये कोणतीही शंका नाहीये की, न्यासा बॉलिवूडमधील स्टारकिड्समध्ये सर्वात स्टायलिश मुलगी आहे. ती नेहमीच तिचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करते. असे म्हटले जाऊ शकते की, पदार्पणापूर्वीच न्यासाचा चाहतावर्ग खूपच तगडा आहे. मात्र, मागील काही काळात तिच्या लूकमध्ये खूपच बदल झाला आहे. यावर्षी अभिनेत्री भूमी पेडणेकर हिच्या दिवाळी पार्टीत न्यासा देवगणने एन्ट्री केली होती. यावेळी तिचा स्टायलिश लूक सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला होता.

नेटकऱ्यांनी लूकवरून केले ट्रोल
अनेक चाहत्यांनी न्यासाचा लूक पाहून तिची प्रशंसा केली. मात्र, काहींनी न्यासाला ट्रोल केले. इतकेच नाही, तर काहींनी असा दावा केला की, काजोल आणि अजयने सुंदर दिसण्यासाठी मुलीवर कॉस्मेटिक सर्जरी आणि बोटोक्स उपचार केले आहेत. या अफवांमध्ये आता काजोलने मौन सोडले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nysa Devgan (@nysadevganx)

काय म्हणाली काजोल?
नुकतेच माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत काजोलने तिच्या मुलीच्या ट्रान्सफॉर्मेशनबद्दल चर्चा केली. ती म्हणाली की, “तिच्याकडे सौंदर्याच्या अनेक टिप्स असतात. खरंच मी माझ्या मुलीकडून टिप्स घेते. न्यासा सोशल मीडियावर सक्रिय असते. तसेच, तिला सुंदरता आणि आरोग्याशी संबंधित बरीच माहिती आहे. ती आठवड्यातून तीन वेळा फेस मास्क लावते आणि न्यासा मलाही असे करण्यास सांगते. न्यासा तिच्या वडिलांसारखीच फिटनेस फ्रीक आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Kajol Devgan (@kajol)

अनेक कलाकारांच्या मुलांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. मात्र, न्यासा देवगण ही केव्हा बॉलिवूड पदार्पण करणार, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
पुन्हा वादात अडकला ‘इंडियन आयडल 13’ शो, आता तर ‘आशिकी’ फेम अभिनेत्रीनेच लावलेत गंभीर आरोप
आमिर खानची लेक आयरा बसली बॉयफ्रेंडच्या कुशीत, दोघांचेही रोमँटिक फोटो सर्वत्र व्हायरल

हे देखील वाचा