Friday, December 1, 2023

डिमांड तर बघा! रकुल प्रीत सिंगला करायचे होते ‘या’ रोमँटिक सिनेमात काम, शाहरुख खानला मानते आदर्श

बाॅलिवूड अभिनेत्री रकुलप्रीत सिंगने दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिच्या अभिनय कौशल्या आणि सौंदर्यासाठी तिला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. रकुलप्रीत सिंगचा जन्म 10 ऑगस्ट 1990 रोजी पंजाब, भारत येथे झाला. तिने तिचे शालेय शिक्षण पंजाबातून पूर्ण केले आणि पुढे दिल्ली विद्यापीठातून मानसशास्त्रात पदवी प्राप्त केली.

बॉलिवूड अभिनेत्री रकुलप्रीत सिंग तिच्या आगामी ‘थँक गॉड’ या चित्रपटामुळे चर्चेत आली होती. अजय देवगण आणि रकुल प्रीत एकदा ‘थँक गॉड’मध्ये एकत्र काम करताना दिसले. त्यावेळी, रकुलप्रीत सिंगचे नवीन व्हिडिओ गाणे ‘मेहबूबा’ देखील रिलीज झाले होता. रकुल प्रीतने तिच्या मेहनतीमुळे साऊथ ते बॉलिवूड हा प्रवास गाठला आहे. ‘रनवे 34’ ‘यारियां’, ‘दे दे प्यार दे’, ‘अटॅक’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केलेल्या रकुलला आता बायोपिक आणि रोमँटिक चित्रपटांमध्ये काम करायचे होते.

एका मुलाखतीदरम्यान रकुलप्रीतने (rakul preet singh) तिची इच्छा व्यक्त केली होती आणि सांगितले होते की, तिला बायोपिकमध्ये काम करायचे आहे, फक्त एक चांगली कथा असावी. याशिवाय तिने पुढे सांगितले की, तिला शाहरुख खानचा ‘डीडीएलजे’, शाहिद कपूर, करीना कपूरचा ‘जब वी मेट’, रणबीर-दीपिकाचा ‘ये जवानी है दिवानी’ यासारख्या शुद्ध रोमँटिक सिनेमांमध्ये काम करायचे आहे.

कामाच्या आघाडीवर, रकुलकडे दोन बॅक टू बॅक चित्रपट देत आहे. रकुल प्रीत सिंह ‘डॉक्टर जी’मध्ये अभिनेता आयुष्मान खुरानासोबत (ayushaman khurana) रोमान्स करताना दिसली. याशिवाय इंद्र कुमार दिग्दर्शित अजय देवगण (ajay devgan) आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​(siddharth malhotra) यांच्या थँक गॉड या चित्रपटातही रकुलप्रीत दिसली. रकुलप्रीत सिंगने ‘यारियां’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. रकुल ‘यारियां’मध्ये अभिनेता हिमांश कोहलीसोबत (himanshu kohali) दिसली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. (Birthday Special Read Rakul Preet Singh life story)

आधिक वाचा-
काय सांगता! विद्या बालनला खरंच झाली मुलगी? शेवटी अभिनेत्रीने स्वत:च केला खुलासा, म्हणाली…
वाढदिवसाचे औचित्य साधून रकुलप्रीत सिंगने केला ‘या’ निर्मात्यासोबत असलेल्या नात्याचा खुलासा

हे देखील वाचा