Sunday, May 19, 2024

काय सांगता! विद्या बालनला खरंच झाली मुलगी? शेवटी अभिनेत्रीने स्वत:च केला खुलासा, म्हणाली…

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालनला तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल कमी बोलणे आवडते. ती पती सिद्धार्थ रॉय कपूरसोबत क्वचितच पोस्ट करते. अशा परिस्थितीत विद्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते आतुर आहेत. अलीकडेच, तिचा एक व्हिडिओ समोर आला, ज्यानंतर लोक असा अंदाज लावू लागले की, विद्या बालनला एक गुप्त मुलगी आहे. सध्या या विषयाची सोशल मीडियार चांगलीच चर्चा रंगली आहे.

झालं असं की, काही दिवसांपूर्वी विद्या बालन (vidya balan ) मुंबई विमानतळावर एका मुलीसोबत स्पॉट झाली होती. यादरम्यान, विद्या एका बहुरंगी को-ऑर्डर सेटमध्ये गुलाबी शॉर्ट ड्रेसमध्ये दिसलेल्या बाळासोबत दिसली. व्हिडिओ शेअर करताना एका फोटोग्राफरने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘विद्या बालन गोंडस मुलीसोबत.’ व्हिडिओ समोर येताच, अभिनेत्री खरोखरच आई झाली आहे का? असा प्रश्न अनेाकांना पडला आहे. यार खुद्द अभिनेत्रीनेच खुलासा केला आहे.

सध्या व्हायरल होत असलेल्या अफवांवर विद्याने बालन म्हणाली की, “ती माझ्या बहिणीची मुलगी इरा आहे. तिला जुळी मुले आहेत. एक मुलगा, रुहान आणि इरा.” विद्याने केलेल्या या खुलाशानंतर अभिनेत्रीला कोणतीही गुप्त मुलगी नसल्याचे स्पष्ट झाले आहे . विद्याचे तिच्या बहिणीच्या मुलांवर आईसारखे प्रेम असल्याचेही चाहत्यांना कळले आहे.

विद्या बालनने चित्रपट निर्माता सिद्धार्थ रॉय कपूरसोबत लग्न केले आहे. दोघांच्या लग्नाला 11 वर्षे झाली असून विद्या अजून आई बनलेली नाही. विद्या बालन शेवटची थिएटरमध्ये रिलीज झालेल्या ‘नियात’ चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिने गुप्तहेराची भूमिका साकारली होती. लवकरच ही अभिनेत्री ‘लव्हर्स’ चित्रपटात दिसणार आहे, ज्यामध्ये इलियाना डिक्रूझ आणि प्रतीक गांधी तिच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. (Famous Bollywood actress vidya balan broke her silence on rumours of having secret daughter after viral video said she was her neice)

आधिक वाचा-
‘महाराष्ट्राला वाचवा…’, तेजस्विनी पंडितचं ‘ते’ ट्वीट चर्चेत, फडणवीसांचा व्हिडिओ शेअर करत म्हणाली…
अभिनेत्री संदीपा धरनेच्या बोल्डनेसने इंटरनेटवर घातला धुमाकूळ, फोटो पाहून तुम्हाला फुटेल घाम

हे देखील वाचा