Friday, December 1, 2023

शूटिंगदरम्यान नेहा धूपियाने खाल्ल्या होत्या चक्क 35 पाणीपुरी, खऱ्या आयुष्यात खाते इतक्या पाणीपुरी

‘द कपिल शर्मा शो’मध्ये नेहमीच नवनवीन कलाकार येत असतात. अशातच पुढच्या एपिसोडमध्ये यामी गौतम, नेहा धुपिया आणि अतुल कुलकर्णी त्यांचा ‘ए थर्सडे’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी येणार आहेत. हा चित्रपट ‘ए थर्सडे’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म डिझ्नी हॉट स्टारवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची स्टारकास्ट कपिल शर्माच्या शोमध्ये एन्जॉय करताना दिसणार आहे. या शोमध्ये नेहाने तिच्या आयुष्यातील पाणीपुरीचा एक किस्सा शेअर केला आहे.

‘द कपिल शर्मा’च्या लेटेस्ट एपिसोडमध्ये नेहा धुपीयाने सांगितले की, एका चित्रपटाच्या शूटिंगमध्ये तिला पाणीपुरी खायची होती. हा सीन शूट करताना तिला तब्बल ३६ पाणीपुरी खायला लागल्या होत्या. हा किस्सा सांगितल्यानंतर कपिलने तिला विचारले की, “ती वैयक्तिक आयुष्यात किती पाणीपुरी खाते?” यावर तिने 24 असे उत्तर दिले. परंतु आता केवळ ती 3-4 पाणीपुरी खाऊ शकते. परंतु जेव्हा तिचा पती अंगदसोबत स्पर्धा लागते तेव्हा ती सगळ्या पाणीपुरी खाते. (Neha dhupia reveals she ate 36 golgappa for movie shooting)

हे उत्तर ऐकून कपिल शर्मा, अर्चना पुरण आणि बाकी सगळे लोक जोरजोरात हसायला लागतात. या शोमध्ये यामी गौतम देखील येणार आहे. त्यावेळी कपिलने तिला तिच्या नावावरून प्रश्न विचारले, तेव्हा तिने सांगितले की, तिचे नाव तिच्या आजोबांनी ठेवले आहे.

दरम्यान, बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपियाने (Neha Dhupia) मिस इंडियाचा किताब पटकावला आहे. त्यानंतर तिने चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. नेहा धुपिया बॉलिवूडमध्ये तिच्या ‘रफ ऍंड टफ’ इमेजसाठी ओळखली जाते. यासोबतच ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदो चर्चेत येते. शिवाय तिच्या अफेअरच्या बातम्याही समोर येत यायच्या.  10 मे 2018 रोजी नेहा धूपियाने अभिनेता अंगद बेदीशी (Angad Bedi)लग्न केले.

हेही वाचा –
‘बौद्ध, जैन, लिंगायत, शीख सगळे हिंदूच आहेत, पण…’ अभिनेते शरद पोंक्षे यांचे वक्तव्य
दृष्ट लागावी इतके सुंदर आहे उर्मिला कोठारेचे सौंदर्य, फोटोवर खिळल्या लाखो नजरा

हे देखील वाचा