Thursday, March 13, 2025
Home बॉलीवूड ‘बिग बॉस १४’ मधून अचानक प्रकाशझोतात आलेल्या राहुल वैद्यने इंडियन आयडलपासून केली करिअरची सुरुवात

‘बिग बॉस १४’ मधून अचानक प्रकाशझोतात आलेल्या राहुल वैद्यने इंडियन आयडलपासून केली करिअरची सुरुवात

आपल्या इंडस्ट्रीमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी आपल्या करिअरची सुरुवात रिॲलिटी शोमधून केली. सर्व सामान्य घरातून येऊन संघर्ष करणे आणि आपले स्थान निर्माण करणे हे कोणत्याही कलाकारासाठी सोपे नसते. अनेकदा अपयशाला सामोरे जावे लागते. मात्र मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर आपले लक्ष्य साधणारे लोकंच इथे यशस्वी होतात. असाच एक यशस्वी गायक म्हणजे राहुल वैद्य. ज्याने आज असंख्य लोकांमध्ये स्वतःची एक ओळख मिळाली निर्माण केली आहे. गायक राहुल वैद्य मागील काही काळापासून चांगलाच लाइमलाइटमध्ये आला. आज (२३ सप्टेंबर) राहुल त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्ताने त्याच्या आयुष्यावर टाकलेला एक प्रकाशझोत.

राहुलच्या करिअरची सुरुवात इंडियन आयडलच्या पहिल्या पर्वापासून झाली. राहुलने जरी हा शो जिंकला नसला तरी त्याला चांगलीच लोकप्रियता मिळाली. या शोनंतर त्याच्या प्रवासाला खरी सुरुवात झाली. राहुल वैद्य गुरुवारी (२३ सप्टेंबर) आपला ३४ वा वाढदिवस साजरा करत आहेत. राहुलने आपल्या कारकीर्दीच्या सुरुवातीपासून फक्त गाणीच गायली नाहीत, तर त्याने ‘आजा माही वे’ आणि ‘झूम इंडिया’ हे रिॲलिटी शो होस्ट देखील केले. राहुलने इंडियन आयडल व्यतिरिक्त, ‘जो जीता वही सुपरस्टार’, ‘संगीत का महामुकाबला’ या शोमध्ये देखील भाग घेतला होता. या शोमध्येही त्याला चांगलीच पसंती मिळाली. मात्र त्याला खरी ओळख मिळाली ती ‘बिग बॉस १४’ या शोमधून. या शोमुळे त्याच्या लोकप्रियतेत आणि प्रसिद्धीत खूप वाढ झाली. राहुल वैद्य हा ‘बिग बॉस १४’ चा उपविजेता ठरला होता. बिग बॉसमध्ये त्याला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळाले.

कलर्स टीव्ही वरील वादग्रस्त शो म्हणून ‘बिग बॉस’ या शोला ओळखले जाते. या शोच्या १४ व्या सिझनमध्ये सहभागी झाल्यानंतर राहुलची लोकप्रियता वाढत गेली. इतकेच नव्हे तर चाहत्यांच्या प्रेमाचा असा परिणाम झाला की, तो शोचा उपविजेता ठरला. या शो दरम्यान राहुल वैद्य आणि अली गोनी यांची मैत्री ही पाहायला मिळाली. त्याचबरोबर या शोमध्ये त्यांची मैत्री चाहत्यांच्या चांगलीच पसंतीस उतरली. हा शो संपल्यानंतर ही दोघे अनेक वेळा लंच आणि डिनरमध्ये एकत्र दिसतात.

‘बिग बॉस १४’ नंतर राहुल वैद्यने ‘खतरों के खिलाडी’ या शोमध्येही भाग घेतला. यामध्ये तो अनेक कठीण स्टंट करताना दिसत आहे. आता त्याने शोच्या टॉप ५ मध्ये आपले स्थान पक्के केले आहे. तो हा शो जिंकेल अशी त्याच्या चाहत्यांची इच्छा आहे.

गायक राहुल वैद्यने ‘बिग बॉस’ हा शो संपल्यानंतर याच वर्षी जुलै महिन्यामध्ये अभिनेत्री दिशा परमारसोबत लग्न केले. त्याने बिग बॉसच्या घरात असताना जेव्हा दिशा परमार त्याला भेटायला आली होती तेव्हा त्याने तिला लग्नासाठी प्रपोज केले होते. तेव्हा तिने होकार दिला होता.

लग्नानंतर राहुलचा हा पहिला वाढदिवस आहे. राहुल वैद्यचा वाढदिवस यावर्षी खास होणार आहे. कारण तो पत्नी दिशा परमारसोबत मालदीवला सुट्टीसाठी रवाना झाला आहे. मालदीवमध्ये तो पत्नीसोबत वाढदिवस साजरा करणार आहे. तर दुसरीकडे, जर आपण दिशा परमारबद्दल बोलायचे झाले, तर ती सध्या ‘बडे अच्छे लगते हैं २’ या मालिकेमध्ये दिसत आहे.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

श्रीदेवी यांच्या हिट गाण्यावर जबरदस्त नाचली पाकिस्तानी अभिनेत्री आयजा खान

मंसूर अली खान पतौडींच्या पुण्यतिथी दिनी सोहा अली खान शर्मिला टागोर यांनी घेतले त्यांच्या कब्रचे दर्शन

फॅन्सला पुन्हा झाला बिग बॉस फेम सोनाली फोगट यांच्या जबरदस्त डान्सचा ‘दिदार’

हे देखील वाचा