काही कलाकार किंवा काही लोकं हे मनोरंजन क्षेत्रात येण्याचे स्वप्न बघतात ते फक्त ग्लॅमर, पैसे आणि प्रसिद्धी मिळते यामुळे. मात्र काही लोकांसाठी अभिनय करणे ही त्यांची पॅशन किंवा छंद असतो. या क्षेत्रात काम करणारे काही कलाकार उच्चशिक्षित आहेत आणि अभिनयात येण्यापूर्वी तगड्या पगाराच्या नोकरीवर देखील होते. मात्र फक्त आणि फक्त अभिनयासाठी त्यांनी त्यांच्या नोकरीवर पाणी सोडले आणि अभिनयाची कास धरली. असे कलाकार सध्या टेलिव्हिजन आणि चित्रपट क्षेत्रात कार्यरत आहे. असेच एक कलाकार म्हणजे आ.तु.भिडे उर्फ भिडे सर उर्फ मंदार चांदवडकर. मंदार आज त्यांचा ४६ वा वाढदिवस साजरा करत आहे. जाणून घेऊया त्यांच्याबद्दल अधिक माहिती.
मंदार यांचा जन्म २७ जुलै १९७६ रोजी मुंबईत एका महाराष्ट्रीयन कुटुंबात झाला. त्यांचे संपूर्ण शिक्षण मुंबईतच झाले. त्यांनी मेकॅनिकल इंजिनीअर म्हणून दुबईमध्ये तीन वर्ष नोकरी केली. नंतर अभिनयात काम करण्यासाठी त्यांनी त्यांची नोकरी सोडली आणि ते पुन्हा भारतात आले. अभिनयात काम मिळवण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. या दरम्यान त्यांनी अनेक मराठी नाटकं, चित्रपटांमध्ये लहान लहान भूमिका केल्या. (birthday special taarak mehta fame mandar chandwadkar)
त्यानंतर त्यांच्या नशिबाने यशाचा दरवाजा त्यांच्यासाठी उघडला गेला आणि त्यांना सोनी सब चॅनलवरील ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ ही मालिका ऑफर झाली. या मालिकेने मंदार यांना एका रात्रीत स्टार केले. शिवाय या मालिकेने आणि ‘आत्माराम भिडे’ या भूमिकेने त्यांना एवढी मोठी ओळख दिली, की आज लोकं त्यांचे खरे नवं विसरून गेले असून, त्यांना भिडे नावानेच ओळखू लागले आहेत.
या मालिकेमुळे मंदार यांच्या आयुष्यात खूप मोठे बदल झाले. इतकेच काय मंदार यांच्या शेजारचे लोकं देखील त्यांना भिडे नावानेच ओळखायचे. त्यांना भिडे सारखेच गंभीर समजले जाते, मात्र खऱ्या आयुष्यात ते खूपच मस्त आणि बिनधास्त स्वभावाचे आहेत. या मालिकेने त्यांना इतकी लोकप्रियता मिळवून दिली त्यांच्या घरी विजेचे बिल देणारा व्यक्ती देखील भिडे सरांचे घर कुठे आहे असाच पत्ता विचारतो.
मंदार यांना या मालिकेने प्रसिद्धी आणि लोकप्रियता तर दिलीच, सोबत पैसा देखील मिळवून दिला. आज मंदार यांची २० कोटींची संपत्ती असल्याचे सांगितले जाते. ते एका भागासाठी ४५००० रुपये चार्ज करतात असे एका रिपोर्टमध्ये सांगितले आहे. ही मालिका सुरु झाल्यापासून ते आजपर्यंत मंदार मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-केआरकेवर एका फिटनेस मॉडेलने लावला बलात्काराचा आरोप; मुंबईमध्ये झाली तक्रार दाखल
-‘ती माझा जीव घेईल…’, जेव्हा करीना कपूरबाबत बोलताना सैफ अली खानने केला होता त्या गोष्टीचा खुलासा