केआरकेवर एका फिटनेस मॉडेलने लावला बलात्काराचा आरोप; मुंबईमध्ये झाली तक्रार दाखल


बॉलिवूड कलाकार नेहमीच अनेक गोष्टींवर त्यांची मतं मांडताना दिसतात. देशातील अगदी कोणताही विषय असला, तरी ते त्यांचे मत मांडत असतात. तसेच ते इतर बॉलिवूड कलाकारांबाबत देखील मत मांडत असतात. यातच नाव येते ते म्हणजे अभिनेता कमाल रशिद खान याचे. तो अनेकवेळा इतर कलाकारांबाबत केलेल्या विवादित ट्वीटमुळे चर्चेत असतो. नेहमीच इंडस्ट्रीमधील लोकांशी पंगा घेणारा केआरके आज स्वतः एका अडचणीत सापडला आहे. एका महिलेने त्याच्याविरुद्ध बलात्काराचा आरोप लावला आहे.

केआरकेवर बलात्कार करण्याचा आरोप करणारी महिला एक लोकप्रिय फिटनेस मॉडेल आहे. या मॉडेलने २६ जून २०२१ रोजी एफआयआर दाखल केली होती. तिने मुंबईमधील वर्सावा पोलीस स्टेशनमध्ये ही तक्रार दाखल केली आहे. परंतु आतापर्यंत याबाबत कोणतीही माहिती समोर आली नव्हती. आता सोशल मीडियावर या मॉडेलने केस केलेल्या एफआयआरची कॉपी व्हायरल झाली आहे.

ही महिला काही वर्षापासून फिटनेसबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आहे. त्यामुळे ती खूप चर्चेत आहे. केआरके सध्या त्याच्या दुबईतील घरी आहे.

काही दिवसापूर्वी केआरकेने त्याच्या घराबाहेरील एक सेल्फी पोस्ट केली होती. तो नेहमीच सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. मागील काही दिवसांपूर्वी तो सलमान खानच्या ‘राधे’ या चित्रपटाबाबत रिव्ह्यू दिल्यामुळे खूप चर्चेत होता. यानंतर सलमान खानने त्याच्याविरुद्ध मानहानीची केस केली होती. त्यावर कोर्टात केस चालू होती. (Kamal Rashid Khan accused of rape by fitness model fir register in mumbai)

सलमान खानसोबत पंगा घेतल्यानंतर केआरकेने गायक मिका सिंगवर निशाणा साधला होता. या नंतर सोशल मीडियाद्वारे त्यांच्यामध्ये बरेच वाद झाले होते. यानंतर त्याने गोविंदाचे नाव घेऊन देखील ट्वीट केले होते. परंतु त्यानंतर त्याने याबाबत स्पष्टीकरण दिले होते. नुकतेच त्याने बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर याला त्याचा खरा मित्र म्हटले आहे. तसेच तो खरा मर्द आहे, असे देखील तो म्हणाला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बॉलिवूड निर्माता सत्येंद्र त्यागीवर एका महिलेने केले गंभीर आरोप; नंदग्राममध्ये दाखल करण्यात आला गुन्हा

-आदित्य नारायणही घेणार ‘बिग बॉस १५’मध्ये सहभाग? सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत केला खुलासा

-सई ताम्हणकरचा स्टायलिश अंदाज अन् हॉट लूक करतोय चाहत्यांना वेडा; कलाकारांच्याही उमटतायेत प्रतिक्रिया


Leave A Reply

Your email address will not be published.