‘त्यांना मला नेहमीच ग्लॅमरस लूकमध्ये बघायला आवडते’, करीनाने सांगितले सासू शर्मिला टागोरसोबतच्या बॉन्डबद्दल


बॉलिवूड अभिनेत्रींना वेगवेगळ्या स्टाईल करायला, लूक करण्याची प्रचंड आवड असते. अगदी पारंपरिक लूकपासून ते वेस्टर्न लूकपर्यंत त्या सगळं ट्राय करत असतात. याच यादीत नाव येतं ते म्हणजे अभिनेत्री करीना कपूर खान हिचं. ती तिच्या लूकसोबत अनेक प्रयोग करते असते. याबाबत बोलताना करीनाने एकदा सांगितले होते की, तिची सासू शर्मिला टागोर यांना तिला ग्लॅमरस अवतारात बघायला खूप आवडते. करीनाने ‘दबंग’ या चित्रपटात ‘फेविकॉल’ या गाण्यावर डान्स केला होता. त्या गाण्यातील तिचा लूक शर्मिला टागोर यांना खूप आवडला होता. करीना कपूर या गाण्यात खरंच खूप सुंदर आणि ग्लॅमरस दिसत होती.

पीटीआयला २०१५ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत करीना कपूरने सांगितले होते की, “त्यांना (शर्मिला टागोर) मला ग्लॅमरस लूकमध्ये बघायला खूप जास्त आवडते. फेविकॉल गाण्यातील माझा लूक त्यांना खूप आवडला होता. तसेच या गाण्यातील माझा डान्स देखील त्यांना खूप आवडला होता. त्यामुळे त्या मला नेहमी सांगत असतात की, मी नेहमी सेक्सी आणि ग्लॅमरस दिसायला पाहिजे. मला असे वाटते की, हे माझे कौतुक आहे, कारण लग्नानंतर ग्लॅमरस दिसणे मला खूप आवडते.” हे सासू-सुनेचे नाते खूप चांगले आहे. त्या दोघी एकमेकींवर खूप प्रेम करतात.

करीना कपूर तिची सासू शर्मिला टागोर यांना तिची प्रेरणा मानते. करीनाने सांगितले की, “त्या माझी प्रेरणा आहेत. कारण त्यांनी लग्ना झाल्यानंतर, तसेच मुलं झाल्यानंतरही त्यांचे करिअर सोडले नाही. त्यांनी अनेक मोठे सुपरस्टार आणि निर्मात्यांसोबत काम केले आहे. त्या मला नेहमीच करिअरसाठी आणि कुटुंबासाठी प्रेरणा देतात.” (Kareena Kapoor Khan’s mother in low Sharmila Tagore wants to see kareena kapoor sexy and glamours)

करीनाने याच वर्षाच्या सुरुवातीला तिचा दुसरा मुलगा जेह याला जन्म दिला आहे. तसेच त्यांचा पहिला मुलगा तैमूर हा चार वर्षाचा आहे. स्टारकिडमध्ये तैमूर टॉपला आहे. त्याचे फोटो आणि व्हिडिओ नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यामुळे करीनाने छोटा मुलगा जेह याला सोशल मीडियापासून लांब ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तिने अजूनही तिच्या मुलाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले नाही. करीना कपूर ही आमिर खानसोबत त्याचा आगामी चित्रपट ‘लाल सिंग चड्डा’ मध्ये दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बॉलिवूड निर्माता सत्येंद्र त्यागीवर एका महिलेने केले गंभीर आरोप; नंदग्राममध्ये दाखल करण्यात आला गुन्हा

-आदित्य नारायणही घेणार ‘बिग बॉस १५’मध्ये सहभाग? सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत केला खुलासा

-सई ताम्हणकरचा स्टायलिश अंदाज अन् हॉट लूक करतोय चाहत्यांना वेडा; कलाकारांच्याही उमटतायेत प्रतिक्रिया


Leave A Reply

Your email address will not be published.