बॉबी देओलने (Bobby Deol) त्याच्या कारकिर्दीची दुसरी इनिंग वेगळ्या पद्धतीने सुरू केली. तो वेब सिरीज आणि चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारताना दिसतो. मोठ्या पडद्यावर तो कितीही उग्र दिसत असला तरी, खऱ्या आयुष्यात तो एक अतिशय साधा माणूस आहे. बॉबी म्हणतो की त्याचे वडील धर्मेंद्र आणि भाऊ सनी देओल देखील असेच आहेत. देओल कुटुंब भावनिक असल्याचा फायदा अनेकांनी घेतला आहे.
माध्यमांशी अलिकडेच झालेल्या संभाषणात बॉबी देओल म्हणाला की, त्याचे वडील धर्मेंद्र, भाऊ सनी देओल आणि तो खूप साधे लोक आहेत. याचा फायदा अनेकांनी घेतला पण तरीही देओल कुटुंब आणि बॉबी देओल यांच्या स्वभावात बदल झालेला नाही.
या संभाषणात बॉबी देओल म्हणतो, ‘सनी भैया आणि माझ्यामध्ये वयाचे खूप अंतर आहे. त्याने मला लहानपणापासूनच शिस्तबद्ध राहण्यास शिकवले आहे. माझ्या लहानपणी तो मला पहाटे ५ वाजता उठवून व्यायाम करायला सांगायचा. तेव्हा मला वाईट वाटायचे पण आज मी शिस्तबद्ध दिनचर्या पाळतो आणि याचे कारण माझा भाऊ आहे.
‘अॅनिमल’ चित्रपट आणि ‘आश्रम’ या वेब सिरीजमध्ये नकारात्मक भूमिका साकारून बॉबी देओल प्रसिद्धीच्या झोतात आला. तो दक्षिण चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिकाही करत आहे. या वर्षी तो ‘अल्फा’ या हिंदी चित्रपटातही दिसणार आहे. तो ‘हरि हर वीरा मल्लू’ हा दक्षिणेकडील चित्रपटही करत आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
लव्ह लाईफमुळे हनी सिंग पुन्हा एकदा चर्चेत, प्रेयसी एम्मा बेकरसोबतच्या चर्चांना उधाण
स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा वादात प्रकाश राज यांचा प्रवेश; म्हणाला, ‘तामिळनाडू कसे आहे..’