Tuesday, June 24, 2025
Home अन्य ‘निर्भीड’ आणि ‘बिनधास्त’पणासाठी ओळखली जाणारी निक्की तांबोळी घाबरलीय? पाहा काय आहे नक्की प्रकरण

‘निर्भीड’ आणि ‘बिनधास्त’पणासाठी ओळखली जाणारी निक्की तांबोळी घाबरलीय? पाहा काय आहे नक्की प्रकरण

‘बिग बॉस – १४’ची स्पर्धक राहिलेली निक्की तांबोळी तिच्या ग्लॅमरस लुकमुळे बऱ्याच चर्चा रंगवते. शोमध्ये अभिनेत्रीला देशभरातील प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळाले. निक्की तिच्या लूकबद्दल बरीच गंभीर आहे, पण जेव्हा बिग-बॉसचे टास्क यायचे तेव्हा ती ते पूर्ण उत्साहाने पूर्ण करायची. शोचा होस्ट सलमान खानदेखील निक्की तांबोळीचे खूप कौतुक करायचा. सध्या तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये निर्भीड आणि बिनधास्त निक्की चक्क घाबरलेली पाहायला मिळाली आहे.

प्रसिद्ध फोटोग्राफर व्हायरल भयानीच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून निक्कीचा हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. तिचा हा व्हिडिओ मुंबईला परततानाचा आहे. यात आपण पाहू शकतो की, निक्की तांबोळी विमानात बसली आहे. यात जसे जसे हवेच्या दबावामुळे विमानाची हालचाल वाढत जाते, तसतशी निक्कीची भीतीही वाढताना दिसली. अभिनेत्रीचा घाबरलेला अंदाज प्रथमच चाहत्यांना पाहायला मिळाला. ज्यामुळे युजर्सने या व्हिडिओवर खूप कमेंट्स केल्या आहेत.

तमिळ आणि तेलगू चित्रपटांमध्ये हात आजमावल्यानंतर निक्कीने ‘बिग-बॉस’द्वारे प्रेक्षकांच्या मनात एक विशेष स्थान निर्माण केले. शोमध्ये प्रवेश करत तिने स्वत: चे एक बोल्ड आणि हॉट गर्ल म्हणून वर्णन केले होते. निक्की तिच्या फॅशन सेन्सबद्दल खूपच चौकस आहे. शोमध्येही ती प्रत्येकवेळी स्टायलिश ड्रेसमध्ये दिसत होती.

निक्कीने ‘चिकती गाडिलो चित्रकोडु’ या तेलगू चित्रपटातून आपल्या अभिनयाची सुरुवात केली. याशिवाय अभिनेत्रीने ‘कंचना 3’, ‘थिप्पारा मीसम’ आणि ‘चिकती गाधिली चिकत्कोतकुडु’ सारख्या चित्रपटांमध्येही काम केले आहे.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर निक्की तांबोळीने काही दिवसांपूर्वी तिचे ‘बर्थडे पावरी’ हे गाणे रिलीझ केले होते. रिलीझ होताच गाण्याने यूट्यूबवर धमाल केली. या गाण्याने आतापर्यंत ६ दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळवले आहेत, यावरून गाण्याची लोकप्रियतेचा अंदाज लावता येऊ शकतो.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘आशिकी २’ चित्रपटातील गाण्यांनी रातोरात प्रसिद्ध झालेल्या अरिजित सिंगचा वर्षभरात मोडला होता सुखी संसार, वाचा त्याची कहाणी

-‘तुम्ही सुपरस्टार असाल तुमच्या घरात…’ म्हणत प्रसिद्ध अभिनेत्याने मारली होती सुपरस्टार राजेश खन्ना यांना कानशिलात

-सहावीला असताना ‘चॉकलेट बॉय’ वरुणची झाली होती नताशासोबत ओळख, तिने ‘इतक्या’ वेळा केले होते रिजेक्ट, वाचा अभिनेत्याबद्दल रंजक गोष्टी

हे देखील वाचा