Sunday, August 3, 2025
Home कॅलेंडर पडद्यावरचा बोल्ड अवतारही मिळवून देऊ शकला नाही बॉलिवूडमध्ये नाव, आज अनामिक आयुष्य जगतात ‘या’ अभिनेत्री

पडद्यावरचा बोल्ड अवतारही मिळवून देऊ शकला नाही बॉलिवूडमध्ये नाव, आज अनामिक आयुष्य जगतात ‘या’ अभिनेत्री

बॉलिवूड इंडस्ट्रीत तुम्ही एकापेक्षा एक ब्युटीक्वीन पाहिल्या असतील. चित्रपटांमध्ये आपले स्थान टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येकाला खूप मेहनत घ्यावी लागते आणि बोल्ड सीन्स हा त्याचाच एक भाग असतो. काही अभिनेत्री त्यांच्या उत्कृष्ट अभिनयासाठी लोकांमध्ये लोकप्रिय आहेत, तर काही त्यांच्या बोल्डनेससाठी ओळखल्या जातात.

अनेक अभिनेत्रींनी आपले मनमोहक अभिनय दाखवण्यासाठी चित्रपटांमध्ये बोल्ड सीन्स दिले. पण, हे सगळं करूनही काही अभिनेत्रींचं नशीब बॉलिवूडमध्ये चमकू शकलं नाही आणि त्या हळूहळू चित्रपटांमधून गायब झाल्या. या यादीत मल्लिका शेरावतपासून उदिता गोस्वामी आणि शर्लिन चोप्रापर्यंतच्या हिरोइन्सच्या नावांचा समावेश आहे. (bold actress  who had flop career in industry)

मल्लिका शेरावत (Mallika Sherawat)
साल २००२ मध्ये ‘जीना सिर्फ मेरे लिए’ या चित्रपटातून करिअरची सुरुवात करणाऱ्या मल्लिका शेरावतला, २००३ मध्ये आलेल्या ‘ख्वाइश’ चित्रपटातून प्रसिद्धी मिळाली. इमरान हाश्मीसोबत ‘मर्डर’ चित्रपटात काम केल्यानंतर ती सर्वांमध्ये लोकप्रिय झाली. या चित्रपटात तिने इमरान हाश्मीसोबत कॅमेऱ्यासमोर एकापेक्षा एक बोल्ड सीन दिले होते. पण, त्यानंतर अशाच भूमिकांसाठी तिच्याशी संपर्क साधला जात होता. आणखी काही चित्रपट केल्यानंतर, ती बॉलिवूडमधून जवळजवळ गायब झाली.

mallika sherawat
Photo Courtesy Instagram mallikasherawat

उदिता गोस्वामी (Udita Goswami)
मल्लिकाप्रमाणेच उदिता गोस्वामीनेही इमरान हाश्मीसोबत ‘जहर’ आणि ‘अक्सर’ सारख्या चित्रपटात काम केले. या चित्रपटांमध्ये तिचा केवळ शो पीस म्हणून वापर करण्यात आला होता. याशिवाय ती हिमेश रेशमियाच्या ‘झलक दिखलाजा’ या प्रसिद्ध गाण्यातही दिसली होती. पण, या मोजक्या चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर आज ती इंडस्ट्रीमधून गायब आहे.

कोयना मित्रा (Koena Mitra)
अभिनेत्री कोयना मित्रा हिने ‘मुसाफिर’ चित्रपटातील ‘साकी साकी’ या गाण्यावर धमाल केली. या गाण्यातील तिची मनमोहक अदा प्रेक्षकांना खूप आवडली. त्यानंतर गाण्यासारखी तिही प्रसिद्ध झाली. पण एवढी प्रसिद्धी मिळूनही आता ती बेपत्ता आहे. कोयाना शेवटची रियॅलिटी शो ‘बिग बॉस’च्या १२व्या सीझनमध्ये दिसली होती.

गीता बसरा (Geeta Basra)
‘द ट्रेन’ या चित्रपटात बॉलिवूड सीरियल किसर इमरान हाश्मीसोबत रोमान्स करणारी गीता बसरा हिला आज सर्व ओळखतात. पण करिअर आणि प्रसिद्धीमुळे नाही, तर क्रिकेटपटू हरभजन सिंगमुळे. खरं तर, इमरानसोबत तिची बोल्ड स्टाईल प्रेक्षकांना दाखवूनही गीता बॉलिवूडमध्ये यशस्वी होऊ शकली नाही आणि चित्रपटांपासून दूर झाली. यानंतर तिने माजी भारतीय क्रिकेटर हरभजन सिंगसोबत लग्न केले आणि आज सगळे तिला फक्त त्याची पत्नी म्हणून ओळखतात.

शर्लिन चोप्रा (Sherlyn Chopra)
‘प्ले बॉय’ मासिकाच्या मुखपृष्ठावर स्थान निर्माण करणाऱ्या शर्लिन चोप्राने, ‘टाइमपास’ आणि ‘रेड स्वास्तिक’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केले. यासोबतच ती ‘बिग बॉस’ या वादग्रस्त शोमध्येही दिसली होती. शर्लिनने पडद्यावर बोल्ड सीन्स दिले, पण त्यानंतरही ती प्रेक्षकांच्या मनात आपली जागा निर्माण करू शकली नाही. तिची कारकीर्द पूर्णपणे बुडाली. गेल्या वर्षी जेव्हा शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा पॉर्न फिल्म बनवण्याच्या प्रकरणात अडकला होता, तेव्हा त्यात शर्लिन चोप्राचे नावही समोर आले होते. या प्रकरणामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली.

Photo Courtesy Instagramsherlynchopraofficial

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
“मला सिगारेट ओढणाऱ्या मुली आवडतात …”, सीमा पाहवा यांचं माेठं वक्तव्य, एकदा वाचाच

मधुचंद्रानंतर पारंपरिक पद्धतीने लग्न करणार स्वरा, हळदीच्या रंगात रंगली अभिनेत्री

हे देखील वाचा