Wednesday, July 3, 2024

‘द फॅमिली मॅन’चे बोल्ड पात्र अन् अल्लू अर्जुनसोबत रोमँटिक गाणं तर नाही ना समंथाच्या घटस्फोटाचे कारण?

दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth prabhu) सध्या ‘पुष्पा’ (Pushpa) चित्रपटाच्या आकर्षणाचे केंद्र असलेल्या, आयटम नंबरमुळे चर्चेत आहे. हे गाणे तिच्या कारकिर्दीतील पहिले आयटम साँग आहे. महत्त्वाचे म्हणजे, नागा चैतन्यसोबत (Naga Chaitanya) असताना ती कधीही अशा प्रोजेक्टचा भाग बनली नाही. ऑक्टोबरमध्येच समंथा आणि नागा चैतन्य यांनी अधिकृतपणे त्यांच्या विभक्त होण्याची घोषणा केली आणि पुन्हा एकदा हे जोडपे त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चेत आले.

समोर आली घटस्फोटाची वेगवेगळी कारणे
जेव्हापासून या जोडप्याने अधिकृतपणे त्यांचे विभक्त होण्याची घोषणा केली आहे, तेव्हापासून वेगवेगळ्या अफवा उडत आहेत. माध्यमांमध्ये असे म्हटले जात आहे की, समंथा ओव्हरटाइम काम करत होती, जे अक्किनेनी कुटुंबाला आवडत नव्हते. काही वृत्तांमध्ये असे म्हटले जात आहे की, समंथाने गर्भपात केला, कारण तिला कधीही मूल नको होते. दरम्यान, एका मुलाखतीत नागा चैतन्यने खुलासा केला आहे की, तो अशा भूमिका करणार नाही ज्यामुळे त्याच्या कुटुंबातील सदस्यांना लाज वाटेल. (bold scene in family man 2 and pushpa item song oo antava behind samantha naga chaitanya divorce)

बोल्ड पात्र तर नाही घटस्फोटाचे कारण?
मुलाखतीत नागा चैतन्यने स्पष्टपणे सांगितले की, “मी सर्व प्रकारच्या पात्रांसाठी तयार आहे. परंतु त्या भूमिकांमुळे माझ्या कुटुंबाचा सन्मान आणि प्रतिष्ठा आणि माझ्या प्रतिष्ठेवर परिणाम होऊ नये. माझ्या कुटुंबातील सदस्यांना लाज वाटेल अशा भूमिका मी कधीही स्वीकारणार नाही.”

काही अहवालामध्ये असे म्हटले जात आहे की, समंथाचे बोल्ड पात्र त्यांच्या नातेसंबंधातील दुरवस्थेसाठी एक कारण असू शकते. तिने ‘सुपर डिलक्स’ आणि ‘द फॅमिली मॅन २’ साठी सेक्स सीन शूट केले होते. तर आता ‘पुष्पा’मधील तिचे आयटम सॉंग देखील तिचा बोल्ड अवतार दर्शवते.

‘या’ चित्रपटांमध्ये दिसणार समंथा
दुसरीकडे, जर आपण समंथाच्या नवीन प्रोजेक्टबद्दल बोललो, तर तिने तिच्या तामिळ-तेलुगु चित्रपट ‘यशोदा’चे शूटिंग सुरू केले आहे. तर चाहते विघ्नेश शिवनच्या ‘कथुवाकुला रेंडू कादल’च्या रिलीझची प्रतीक्षा करत आहे. यात विजय सेतुपती आणि नयनतारा मुख्य भूमिकेत आहेत तर समंथा सहाय्यक भूमिकेत आहे. याशिवाय अभिनेत्रीकडे ‘शाकुंतलम’ आणि डाउनटन ऍबे दिग्दर्शक फिलिप जॉन दिग्दर्शित ‘अॅरेंजमेंट ऑफ लव्ह’ हा आंतरराष्ट्रीय चित्रपटही आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा