रवीना टंडनला देखील झाला सारासोबत ‘चका चक’ गाण्यावर थिरकायचा मोह, पाहा त्यांच्या डान्सचा व्हिडिओ


मागील अनेक दिवसांपासून अभिनेत्री सारा अली खान प्रकाशझोतात आली आहे. सारा, अक्षय कुमार आणि धनुष यांचा ‘अतरंगी रे’ सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचे जोरदार प्रमोशन सुरु झाले असून, सारा या प्रमोशनमध्ये खूपच सक्रिय आहे. ती या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी वेगवेगळ्या शक्कल लढवताना दिसत आहे. ‘अतरंगी रे’ सिनेमातील ‘चका चक’ हे गाणे तुफान लोकप्रिय होत आहे. गाण्याचे शब्द, हटके म्युझिक आणि यावर साराचा आकर्षक डान्स सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत आहे. या गाण्याला मिळणारी लोकप्रियता पाहून साराने चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी एक भन्नाट कल्पना शोधून काढली आहे.

सारा या ‘चका चक’ गाण्यावर वेगवेगळ्या अभिनेत्रींसोबत डान्स करत रिल्स बनवत आहे. आतापर्यंत या गाण्यावर हजारो रिल्स बनले असून, साराने देखील यावर रिल्स व्हिडिओ बनवायचा सपाटा लावला आहे. आधी माधुरीसोबत तिने या गाण्यावर रील बनवले होते, आता तिने अभिनेत्री रवीना टंडनसोबत या गाण्यावर रील बनवले आहे.

साराने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर हा डान्स व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओचं सुरुवातील सारा सलमान खानसोबत बिग बॉस १५ च्या सेटवर दिसते. शिवाय ती सलमानला देखील या गाण्यावर नाचवते आणि त्याच्यासोबत खूप मस्ती करते. त्यानंतर ती रवीनासोबत या गाण्यावर डान्स करते. या व्हिडिओमध्ये साराने गुलाबी आणि निळ्या रंगाचा लेहेंगा आणि त्यावर पोनी टेल घातली असून त्यात ती खूपच सुंदर दिसत आहे. तिचा लूक साधा मात्र तरीही लक्षवेधी ठरला आहे. तर रवीनाने क्रीम कलरचा लॉन्ग ड्रेस घातला आहे. या दोघीनी ‘चका चक’ गाण्यावर जोरदार डान्स करत नेटकऱ्यांची मने जिंकली आहे.

या व्हिडिओच्या शेवटी सारा रवीनला मिठी मारत तिला धन्यवाद म्हणते. बिग बॉसमध्ये सारा ‘अतरंगी रे’च्या प्रमोशनसाठी तर रवीना तिच्या आगामी ‘अरण्यक’ वेबसिरीजच्या प्रमोशनसाठी आली होती. यादरम्यान दोघानीही भेट झाली आणि साराने हे रील बनवले आहे. साराने २०१८ साली ‘केदारनाथ’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. केवळ तीनच वर्षात तिने तिची तुफान फॅन फॉलोविंग तयार केली असून, अभिनयाने सर्वांचे मनं जिंकले आहेत. साराने या तीन वर्षात ४ सिनेमे केले असून, ‘अंतरंगी रे’ तिचा ५ वा सिनेमा आहे. यादरम्यान तिने सुशांत सिंह राजपूत, वरुण धवन, कार्तिक आर्यन, रणवीर सिंह, अक्षय कुमार, धनुष आदी दिग्ग्ज कलाकारांसोबत काम केले आहे. साराच हा ‘अतरंगी रे’ सिनेमा येत्या २४ डिसेंबर रोजी हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा :

World’s Most Admired Men 2021 | टॉप २०मध्ये ५ भारतीय, ‘किंग खान’ १४व्या क्रमांकावर; पंतप्रधान मोदींचा नंबर घसरला

बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधी करत होता ऍड एजेन्सीमध्ये काम, जाणून घ्या जॉन अब्राहमचा पहिला पगार

Shriram Lagoo Death Anniversary | आठवण नटसम्राटाची, श्रीराम लागू यांच्या आयुष्यातील हे किस्से तुम्हाला नक्की ठाऊक नसतील

 


Latest Post

error: Content is protected !!