Tuesday, April 8, 2025
Home बॉलीवूड आमिर खान दिसतोय काठीच्या साहाय्याने चालताना, त्याची अवस्था पाहून तुम्हालाही बसेल धक्का

आमिर खान दिसतोय काठीच्या साहाय्याने चालताना, त्याची अवस्था पाहून तुम्हालाही बसेल धक्का

आमिर खानने अभिनयातून ब्रेक घेतला आहे. रुपेरी पडद्यावर दिसण्यापासून ब्रेक घेतल्यानंतर, अभिनेता सोशल मीडियावर माेठ्या प्रमाणात सक्रिय आहे. अलीकडेच तो एका लग्न समारंभात दिसला, जिथे इंडस्ट्रीतील सर्व स्टार्स उपस्थित होते. या लग्नाचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. मात्र, आमिर खानच्या एका फोटोने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. काय आहे असे फाेटाेमध्ये? चला जाणून घेऊया…

वॉल्ट डिस्ने कंपनी इंडिया आणि स्टार इंडियाचे अध्यक्ष के. माधवन यांचे हे लग्न होते. जयपूरच्या रामबाग पॅलेसमध्ये हा विवाहसोहळा पार पडला, ज्यात अक्षय कुमार, मोहनलाल, पृथ्वीराज सुकुमारन यांच्यासह चित्रपट सृष्टीतील अनेक ए-लिस्ट कलाकारांनी हजेरी लावली होती. स्टार्सने उपस्थित असलेल्या या लग्नात अभिनेता आमिर खान (aamir khan) याचा एक फोटो माेठ्या प्रमाणाच व्हायरल होत आहे.

लग्नाशी संबंधित सर्व फाेटाेंमध्ये एक असा फाेटाे आहे, ज्यामध्ये आमिर खान काठी घेऊन उभा आहे. या लग्नात आमिर दक्षिणेतील पारंपारिक एथनिक पोशाखात दिसत आहे. त्याने पांढऱ्या रंगाचे धोतर आणि क्रीम रंगाचा कुर्ता घातला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

या लग्नात अक्षय कुमारसाेबत साऊथ सिनेसृष्टीतील सुपरस्टार मोहनलाल यांनीही हजेरी लावली होती. लग्नात त्यांनी भांगडा नृत्य सादर केलं, ज्याचा व्हिडिओ अक्षय कुमारने त्याच्या अधिकृत इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडओ साेशल मीडियावर येताच चाहत्यांनी त्यावर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करायला सुरुवात केली.

आमिर खान यांच्या अभिनय प्रवासा विषयी बाेलायचे झाले, तर त्यांनी ‘हम हैं राही प्यार के’, ‘दिल’, ’सरफरोश’, ‘लगान’, ‘दिल चाहता है’, ‘रंग दे बसंती’, थ्री इडियट्स, तलाश आदी अनेक गाजलेले चित्रपट बाॅलिवूडला दिले. (bollywood actor aamir khan spotted walking with sticks in wedding)

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
विवेक अग्निहोत्रींनी पुन्हा एकदा बॉलिवूडकरांवर साधला निशाणा; म्हणाले, ‘मोदींमुळे मला…’

‘आणि विजेता शिव ठाकरे…’, ग्रँड फिनालेपूर्वी व्हायरल झाला बिग बॉसचा हा व्हिडिओ

हे देखील वाचा