आदित्य रॉय कपूर हा बॉलिवूडमधील सर्वात तरुण अभिनेत्यांपैकी एक आहे. तो त्याच्या व्यक्तिमत्त्वाने आणि हसण्याने करोडो लोकांना वेड लावतो. त्याचे फॅन फॉलोइंग खूप मोठे आहे. मात्र, आदित्यला कधीकधी त्याच्या साधेपणाचे आणि उत्स्फूर्ततेचे काही नकारात्मक परिणाम भोगावे लागतात. अशात नुकतेच अभिनेत्यासोबत असेच काही घडले, जेव्हा एक महिला चाहती त्याला जबरदस्तीने किस करण्याचा प्रयत्न करताना दिसली आणि त्याने तसे करण्यास नकार दिला.
आदित्य रॉय कपूरच्या (aditya roy kapur)आगामी ‘द नाईट मॅनेजर’ या सीरिजच्या स्क्रीनिंगदरम्यान ही घटना घडली. या सीरिजमध्ये अनिल कपूर (Anil kapoor) मुख्य भूमिकेत आहे. ही एक स्पाय-थ्रिलर सीरिज आहे.
View this post on Instagram
15 फेब्रुवारी रोजी आदित्यने या सीरिजच्या स्क्रीनिंगमध्ये भाग घेतला होता. यावेळी आदित्यने आपल्या कॅज्युअल लूकने लोकांची मने जिंकली. तो निळ्या रंगाच्या पँटसूटमध्ये दिसला, ज्यासाेबत त्याने पांढऱ्या रंगाचा शर्ट परिधान केला हाेता.
Aditya Roy Kapur with fans at the screening of #TheNightManager tonight. pic.twitter.com/rOWtYkgNuN
— Aditya Roy Kapur FC (@ARKfanatics) February 15, 2023
मात्र, स्क्रिनिंगदरम्यान त्याला एका चाहत्यासोबत अस्वस्थ परिस्थितीचा सामना करावा लागला, ज्याचा व्हिडिओ इंटरनेटवर माेठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये 2 महिला आदित्यच्या जवळ उभ्या आहेत आणि सिनेमा हॉलच्या बाहेर त्याच्यासोबत फोटो काढताना दिसत आहेत.
आदित्यच्या वागण्याचं साेशल मीडियावर काैतुक
तेव्हाच एका महिलेने आदित्यच्या हाताचे चुंबन घेण्यास सुरुवात केली, तर दुसरी महिलाही त्याच्या हाताचे चुंबन घेऊ लागली. त्यानंतर दोघींनी एकत्र फोटोसाठी पोजही दिली. अशात एका महिलेने अचानक आदित्यच्या गालावर किस करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तितक्यात आदित्यने माघार घेतली. आदित्यच्या या वागण्याचं सोशल मीडियावर कौतुक होत असून चाहते यावर भन्नाट कमेटं करत आहेत .(bollywood actor aditya roy kapur calm on the night manager screening female fan grabs actor for forced kiss netizens reacts )
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
स्वरा भास्करने तिच्या साखरपुड्यात नेसली ‘या’ खास व्यक्तीची ४० वर्ष जुनी साडी, इंस्टाग्रामवर दिली माहिती
तुनिशा शर्मा मृत्यु: पोलिसांनी शिजान खानवर दाखल केले चार्जशीट, आज होणार जामिनावर सुनावणी