Thursday, April 18, 2024

स्वरा भास्करने तिच्या साखरपुड्यात नेसली ‘या’ खास व्यक्तीची ४० वर्ष जुनी साडी, इंस्टाग्रामवर दिली माहिती

बॉलिवूडमधील बिनधास्त गर्ल अशी ओळख मिळवणाऱ्या स्वरा भास्करने नुकतेच लग्न केल्याचे जाहीर केले आणि तिच्या चाहत्यांसोबत सर्वांनाच आश्चर्याचा मोठा धक्का बसला. सगळीकडे फक्त सध्या स्वरा भास्करच्याच लग्नाचा विषय आहे. स्वरा आणि फहादने जानेवारी २०२३ मध्ये लग्न केले आणि त्यानंतर १६ फेब्रुवारी रोजी तिने साखरपुडा केला. या सर्वांची माहिती तिने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत दिली. सध्या स्वरा आणि फहादच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. या साखरपुड्यात स्वराने लाल साडी आणि ऑफ-व्हाइट रंगाचा ब्लाउज घातलेला दिसला तर फहादने लाल डिझाइन असलेले नेहरू जॅकेट आणि सिल्कचा ऑफ-व्हाइट कुर्ता-पायजामा घातला होता. स्वराने तिने नेसलेल्या साडीबद्दल एक खास पोस्ट शेअर केली आहे.

स्वराने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट आणि तिचा फोटो शेअर करत लिहिले, “हा दिवस खूप मोठा होता!!!! आम्ही काही महिन्यांसाठी खूप मोठी माहिती जगापासून लपवली. खरं सांगायचे तर माझ्यासारख्या अति उत्साही आणि ओव्हर शेअररसाठी हे लपवणे सर्वात कठीण काम होते.” यासोबतच तिने ही देखील माहिती दिली की, स्वराने नेसलेली साडी ही तिच्या आईच्या लग्नातली साडी असून ती साडी जवळपास ४० वर्षांपूर्वीची आहे. तिने तिच्या पोस्टमध्ये अबू जानी संदीप खोसला यांचे नाव घेत तिच्या लुकबद्दल त्यांचे आभार देखील मानले आहे.

स्वराच्या कोर्ट मॅरेज लग्नाचे अनेक फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यापैकी काही व्हिडिओमध्ये स्वरा स्वतः ढोलावर डान्स करताना दिसत आहे. स्वराने आता कोर्ट मॅरेज केले असले तरी तिला सुद्धा बॉलिवूड स्टाइल धुमधडाक्यात लग्न करायचे आहे. स्वराने ६ जानेवारी रोजी फहादशी स्पेशल मॅरेज अॅक्टनुसार लग्न केलं आहे. प्राप्त माहितीनुसार स्वरा आणि फहाद पुढच्या महिन्यात दणक्यात लग्न करणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
आदिल तुरुंगात जाताच राखी अन् शर्लिनची पुन्हा झाली मैत्री, पाहा व्हायरल व्हिडिओ
भांड फुटलं रे! स्वरा भास्करने केले समाजवादी पक्षाच्या ‘फहाद अहमद’साेबत लग्न, पाहा व्हिडिओ

हे देखील वाचा