Monday, June 24, 2024

अक्षय अन् इम्रानने ‘सेल्फी’च्या प्रमाेशनासाठी केला मेट्रोमधील प्रवाशांसाेबत डान्स; व्हिडिओ व्हायरल

बाॅलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि इमरान हाश्मी लवकरच ‘सेल्फी‘ चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. सध्या दोन्ही स्टार्स या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने दोन्ही स्टार्सनी आज म्हणजेच गुरुवारी (दि. 16 फेब्रुवारी)ला मुंबई मेट्रोमध्ये प्रवास केला. अचानक अक्षय कुमार आणि इमरान हाश्मी यांना मेट्राेमध्ये प्रवास करताना पाहून प्रवाशांना आश्चर्य वाटले. दरम्यान, दोन्ही स्टार्सनी मेट्रोमध्ये डान्स केला. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर माेठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

अक्षय कुमार (akshay kumar) आणि इमरान हाश्मी (emraan hashmi) त्यांच्या ‘सेल्फी’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कोणतीही कसर सोडत नाहीत. नुकतेच दोघेही मुंबई मेट्रोमध्ये स्पॉट झाले. यावेळी अक्षय स्पोर्ट्स आउटफिटमध्ये देखणा दिसत हाेता, तर इमरान हाश्मी जीन्स, टी-शर्ट आणि जॅकेटमध्ये प्रचंड स्मार्ट दिसत हाेता. व्हिडिओमध्ये, अक्षय आणि इम्रान शांतपणे मास्क घालून मेट्रोमध्ये प्रवेश करत हाेते. यावेळी, आजूबाजूला उपस्थित असलेल्या लोकांना अंदाजही नव्हता की, त्यांच्यामध्ये दोन बॉलिवूड स्टार आहेत. पण, चाहत्यांना कळताच ते सर्व सुपरस्टार्ससोबत सेल्फी काढण्यासाठी गर्दी करु लागले.

मेट्रोमध्ये प्रवासादरम्याान अक्षय कुमार आणि इमरान हाश्मी यांनी चाहत्यांशी संवाद साधला आणि ‘मैं खिलाडी तू अनाडी’ या गाण्यावर त्यांच्यासोबत डान्स केला. अक्षय आणि इम्रानला मेट्रोच्या आत एकत्र नाचताना पाहणं सगळ्यांसाठीच आश्चर्याचं होतं. दोन्ही स्टार्स एकमेकांच्या जवळ उभे असल्याचे पाहून त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी लोकांची रांग लागली. अक्षय कुमार त्याच्या चित्रपटांचे वेगळ्या पद्धतीने प्रमोशन करण्यासाठी ओळखला जातो. यावेळी त्यांनी ही पद्धत निवडली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

‘सेल्फी’ हा चित्रपट 24 फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून प्रेक्षकांना ताे खूप आवडला आहे. या चित्रपटात अक्षय कुमार सुपरस्टार आहे, तर इमरान हाश्मी जबरा चाहत्याच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये काय जादू दाखवतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.(bollywood actor akshay kumar and emraan hashmi spotted in mumbai metro surprise fans with dance)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
अंगावर फक्त बेडशीट अन् हातात कॉफी, ‘बिग बॉस 16’ फेम प्रियांकाचा व्हिडिओ जबरदस्त व्हायरल

आलियाने शेअर केला गोंडस बाळाचा फोटो, गोंधळलेल्या नेटकऱ्यांना पडले 1500 प्रश्न; एक नजर टाकाच

हे देखील वाचा