Sunday, May 19, 2024

आलियाने शेअर केला गोंडस बाळाचा फोटो, गोंधळलेल्या नेटकऱ्यांना पडले 1500 प्रश्न; एक नजर टाकाच

कलाकारांची प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असते. चाहत्यांना आलिया भट्ट हिची मुलगी राहा कपूरविषयीदेखील अशीच उत्सुकता आहे. आलियाने मुलीला जन्म दिल्यापासून चाहत्यांना तिचे तोंड पाहण्याची खूपच घाई झाली आहे. मात्र, आलिया आणि रणबीर कपूर यांनी पॅपराजींना त्यांच्या मुलीचे फोटो न काढण्याची अपील केली आहे, अशात स्टार जोडप्याच्या मुलीचा फोटो अद्याप समोर आला नाहीये. मात्र, आता अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्रामवर एका बाळाचा फोटो शेअर केला आहे, ज्यानंतर चाहते खूपच उत्सुक झाले आहेत आणि विचारत आहेत की, हे बाळ राहा आहे का?

आलिया भट्टची इंस्टाग्राम पोस्ट
आलिया भट्ट (Alia Bhatt) हिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर जो फोटो शेअर केला आहे, त्यामध्ये एक गोंडस बाळ दिसत आहे. त्या बाळाने गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. मात्र, या फोटोंवरून अभिनेत्रीने एक बेबी ब्रँडचे प्रमोशन केले आहे. हे फोटो शेअर करत आलियाने भले मोठे कॅप्शनमध्ये लिहिले आहे. या फोटोला 2 तासांच्या आत 6 लाखांहून अधिक लाईक्स आणि दीड हजारांहून अधिक कमेंट्स आल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt ???? (@aliaabhatt)

चाहत्यांच्या प्रश्नांचा भडीमार
मात्र, आलिया भट्टच्या इंस्टाग्राम (Alia Bhatt Instagram) अकाऊंटवर मुलीचे फोटो पाहून चाहते खूपच उत्साही झाले. त्यांनी कॅप्शन न पाहताच कमेंट्समध्ये आलियाला विचारणा केली आहे की, ही मुलगी तिचीच आहे का? एकाने कमेंटमध्ये असे लिहिले की, “ही तुझी मुलगी राहा आहे का?” आणखी एकाने म्हटले की, “सर्वांना वाटले ही राहा आहे. तू आधीच सांगायला पाहिजे होते.” दुसऱ्या एकाने म्हटले की, “ही तुझी मुलगी आहे का?”

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt ???? (@aliaabhatt)

नोव्हेंबरमध्ये आई बनली होती आलिया भट्ट
आलिया भट्ट ही 14 एप्रिल, 2022 रोजी रणबीर कपूर (Ranbir Kapoor) याच्यासोबत लग्नबंधनात अडकली होती. त्यानंतर आलियाने त्याच वर्षी नोव्हेंबर महिन्यात एका मुलीला जन्म दिला होता. त्यानंतर रणबीरची आई आणि दिग्गज अभिनेत्री नीतू कपू (Neetu Kapoor) यांनी राहा (Raha) असे ठेवले. मात्र, आतापर्यंत जोडप्याने त्यांच्या मुलीचा फोटो चाहत्यांना दाखवला नाहीये.

आलियाचे सिनेमे
आलियाच्या कामाविषयी बोलायचं झालं, तर आलिया शेवटची ‘ब्रह्मास्त्र’ या सिनेमात झळकली होती. आता ती करण जोहर याच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत रणवीर सिंग झळकणार आहे. (Actress alia bhatt shared a picture of a baby on her instagram and now fans are asking is this raha kapoor know here)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘स्ट्रगलिंग अभिनेत्यासारखे का वागताय?’, म्हणणाऱ्या युजरला धरम पाजींचे दमदार उत्तर; तुम्हीही कराल कौतुक
शाहरुखने केले सिद्ध! ‘पठाण’ सिनेमाची 500 कोटींच्या क्लबमध्ये दिमाखात एन्ट्री, आता लक्ष्य 1000 कोटींवर

हे देखील वाचा