Wednesday, June 26, 2024

अक्षय कुमार माेठ्या पडद्यावर करणार पुनरागमन, ‘या’ चित्रपटातून देणार लैंगिक शिक्षणाचे धडे

बॉलिवूडमधील सर्वात व्यस्त अभिनेत्यांपैकी एक अक्षय कुमार आहे. 2022 मध्ये त्याचे आतापर्यंत पाच चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. मात्र, हे वर्ष अभिनेत्यासाठी फार विशेष ठरले नाही आणि त्याचा एकही चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाला नाही. दरम्यान, अभिनेत्याने अलीकडेच रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली जिथे त्याने त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली.

अभिनेता अक्षय कुमारने (akshay kumar) नुकतेच जाहीर केले आहे की, त्याचा पुढील चित्रपट सामाजिक संदेश देणारा असेल. त्याचा चित्रपट लैंगिक शिक्षणावर आधारित असेल. अक्षयने शाळांमध्ये लैंगिक शिक्षणाच्या महत्त्वावरही भर दिला आणि सर्व शाळांनी ते शिकवले पाहिजे असे सांगितले.

याबद्दल बोलताना अक्षय म्हणाला, “मी लैंगिक शिक्षणावर चित्रपट बनवत आहे. हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. आपल्याकडे सर्व प्रकारचे विषय शाळेत शिकवतात, पण जगातील प्रत्येक शाळेने हा विषय शिकवावा अशी माझी इच्छा आहे.” अभिनेता पुढे म्हणाला, ” हा चित्रपट रिलीज व्हायला वेळ लागणार आहे. एप्रिल किंवा मे महिन्यात मी हा चित्रपट रिलीज करेन. मी बनवलेल्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी हा एक असेल. मला असे चित्रपट आवडतात जे सामाजिक प्रश्न हाताळतात. अशाप्रकारचे चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या फारसा व्यवसाय करत नाहित, पण मला असे चित्रपट करून समाधान मिळते.”

अक्षयने अलीकडेच ‘हेरा फेरी 3’मध्ये काम न करण्याची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले. अभिनेत्याने खुलासा केला होता की, क्रिएटिव डिफरेंसमुळे त्याने चित्रपट सोडला आहे. विशेष म्हणजे अक्षय नुकताच ‘राम सेतू’ चित्रपटात दिसला होता. दिवाळीला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर विशेष कामगिरी केली नाही. हा चित्रपट अवघ्या 100 कोटींचाही आकडा पार करू शकला नाही. (bollywood actor akshay kumar announced his next film will be based on physical relation education)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
दुःखद! अभिनेत्री कर्स्टी ऍली यांचे निधन, वयाच्या 71व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
माेठी बातमी! ‘इमली’ फेम अभिनेत्रीचा अपघात, शूटिंगवरून घरी परतत असताना ट्रकने घासत नेली कार

हे देखील वाचा