Tuesday, January 31, 2023

‘जेद्दा’मध्ये अक्षय कुमारला भेटला जबरा फॅन, आवडत्या अभिनेत्याची गाडी थांबवून केले ‘हे’ काम

बॉलिवूडचा खिलाडी म्हणजेच अक्षय कुमार नुकताच रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाला होता. दरम्यान, आता अभिनेत्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याचा एक चाहता त्याला भेटतो. व्हिडिओमध्ये अक्षय त्याच्या कारमध्ये बसलेला दिसत आहे आणि त्याचा चाहता कारच्या बाहेर उभा असलेला ‘फिर हेरा फेरी’ मधील राजू वाला पोज देताना दिसत आहे.

अभिनेता अक्षय कुमार (akshay kumar) याने त्याच्या ट्विटर हँडलवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, तो त्याच्या कारमध्ये बसलेला दिसत आहे, तर एक चाहता ‘फिर हेरा फेरी’ पोज देताना दिसत आहे. हे पाहून अभिनेत्याला खूप आनंद झाला आणि त्यासाठी त्याने त्याच्या चाहत्यांचे आभार मानले. व्हिडिओ शेअर करताना अक्षयने लिहिले, “हाहाहा… माझ्या चाहत्यांच्या या हेराफेरीने माझे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल आणि जेद्दाहमधील संस्मरणीय वेळेसाठी सर्वांचे आभार. तुम्हा सर्वांचे प्रेम आणि प्रार्थना.”

स्क्रिप्टन न आवडल्याने अभिनेत्यानं ‘हेरा फेरी 3’ला दिला नकार
गेल्या काही दिवसांपासून अक्षय कुमार त्याच्या नवीन प्रोजेक्टबद्दल चर्चेत आहे. जिथे अक्षय ‘हेरा फेरी 3’ चित्रपटात दिसणार नाही अशी बातमी आली होती. या चित्रपटात खिलाडी कुमार ऐवजी कार्तिक आर्यनला कास्ट केल्याची बातमी येत आहे. अक्षय कुमारने हेरा फेरी 3 चित्रपटाची स्क्रिप्ट न आवडल्याने नकार दिल्याचे मुलाखतीत सांगितले होते. चित्रपट करू न शकल्याने अभिनेता खूप दुःखी आहे आणि ज्याप्रकारे घडामोडी घडत आहेत त्याबद्दल आनंदी नसल्याचेही तो म्हणाला.

अक्षय कुमारच्या काराकिर्दी विषयी बाेलायचे झाले, तर अक्षयने दिल ताे पागल है, ‘खिलाडी’, ‘आवारा पागल दीवाना’, ‘गरम मसाला’, ‘हेरा फेरी’, ‘फिर हेरा फेरी’ यासारखी दमदार चित्रपट बाॅलिवूडला दिली.(bollywood actor akshay kumar met a big fan in jeddah)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येसाठी दिलजीतचा सरकारवर निशाणा; म्हणाला, ‘100% सरकारची…’
ब्रेकिंग! निर्माते नितीन मनमोहन यांना हृदयविकाराचा तीव्र झटका, रुग्णालयात उपचार सुरू

हे देखील वाचा