Tuesday, January 31, 2023

माेठी बातमी! ‘इमली’ फेम अभिनेत्रीचा अपघात, शूटिंगवरून घरी परतत असताना ट्रकने घासत नेली कार

‘इमली’ शोची फेम अभिनेत्री हेतल यादवबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे. अभिनेत्रीच्या कारचा अपघात झाला आहे. ही घटना रविवारी (दि. 4 डिसेंबर)ला रात्री घडली. माध्यमातील वृत्तानुसार, हेतल शूटिंगवरून घरी परतत असताना एका ट्रकने तिच्या कारला धडक दिली. मात्र, अभिनेत्री पूर्णपणे ठीक आहे.

ही माहिती खुद्द अभिनेत्री हेतल यादव (hetal yadav) हिने दिली आहे. माध्यमाशी बोलताना हेतलने आपल्या अपघाताबाबत खुलेपणाने सांगितले. अभिनेत्री म्हणाली, “रविवारी (दि. 4 डिसेंबर)ला रात्री 8.45 च्या सुमारास शूटिंगचे पॅकअप होते, त्यानंतर मी फिल्मसिटीहून घराकडे निघाली. मी JVLR महामार्गावर जाताना एका ट्रकने माझ्या कारला मागून धडक दिली. ट्रकने माझी कार बाजूला ढकलली. माझी गाडी पडणार होती. मी कशीतरी हिम्मत करून गाडी थांबवली आणि माझ्या मुलाला हाक मारली. या घटनेनंतर मी घाबरली असल्याने मी माझ्या मुलाला याबाबत पोलिसांना कळवण्यास सांगितले.”

इंस्टाग्रामवर फाेटाे पाेस्ट करत दिली माहिती
अभिनेत्री सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. या अपघातानंतर ती दुसऱ्या दिवशी शूटिंगला पोहोचली. काही तासांपूर्वीच अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्रामवर तिचा फोटो चाहत्यांसाेबत शेअर केला. अभिनेत्रीने पुढे सांगितले की, “मला कोणतीही इजा झाली नाही आणि मला पहाटे सेटवर जावे लागले कारण, ते शोमधील एका महत्त्वाच्या सीक्वेन्सचे शूटिंग करत होते आणि माझ्यामुळे शूटिंग थांबू नये असे मला वाटत होते.”

अभिनेत्री गेल्या 25 वर्षांपासून अभिनय क्षेत्रात करत आहे काम
‘इमली’ शोमध्ये हेतल यादव शिवानी राणाची भूमिका साकारत आहे. या शोमधील अभिनेत्रीची व्यक्तिरेखा चाहत्यांना खूप आवडते. अभिनेत्री गेल्या 25 वर्षांपासून अभिनय जगतात आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील ‘ज्वाला’ या व्यक्तिरेखेने तिला सर्वाधिक लोकप्रियता मिळाली. (tv show imlie fame hetal yadav met with a car accident actress reveals about incident know about her health)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
‘ओये ओये’ गर्ल सोनम खान 30 वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये करणार पुनरागमन; सांगितलं अभिनय सोडण्याचं कारण
दुःखद! अभिनेत्री कर्स्टी ऍली यांचे निधन, वयाच्या 71व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

हे देखील वाचा