Saturday, April 20, 2024

‘जय भवानी, जय शिवाजी’! अक्षय कुमारचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या लूकमधील व्हिडीओ आला समाेर

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याच्या मराठी चित्रपटामुळे चर्चेत आहे. ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटात अभिनेता छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार असून, मंगळवार (दि. 6 नाेव्हेंबर)पासून या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. हा अक्षय कुमारचा पहिला मराठी चित्रपट आहे. अभिनेत्याने एक खास पोस्ट शेअर करून चित्रपटाच्या शूटिंगच्या सुरुवातीची माहिती दिली आणि त्यानंतर काही वेळाने एक व्हिडिओ देखील शेअर केला, ज्यामध्ये तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या लूकमध्ये दिसत आहे.

अभिनेता अक्षय कुमार (akshay kumar) याने छत्रपती शिवाजी महाराजांचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये अक्षय कुमारची झलक स्पष्टपणे दिसत आहे. अभिनेत्याने लिहिले, “आज मी ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या मराठी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करत आहे, ज्यामध्ये मला छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याचे भाग्य लाभले आहे. त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन आणि माँ जिजाऊंच्या आशीर्वादाने मी माझा पुर्ण देण्याचा प्रयत्न करेन. आशीर्वाद असू द्या.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

त्याचवेळी, चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाल्याची माहिती दिल्यानंतर, अक्षय कुमारने आणखी एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसत आहे आणि समोरच्या दिशेने चालत आहे. हा व्हिडिओ शेअर करत अभिनेत्याने लिहिले, “जय भवानी जय शिवाजी.” महेश मांजरेकर दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती वसीम कुरेशी करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

अक्षय कुमार व्यतिरिक्त या चित्रपटात जय दुधाणे, उत्कर्ष शिंदे, विशाल निकन, विराट मडके, हार्दिक दोशी, सत्या, नवाब खान आणि प्रवीण तरणे यांचा समावेश आहे. पुढील वर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित हाेणार आहे. हा चित्रपट मराठी, हिंदी, तमिळ आणि तेलगू अशा चार भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. (bollywood actor akshay kumar as chatrapati shivaji maharaj first look revealed from vedat marathe veer daudle saat directed by mahesh manjrekar)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
बंगालींवरील ‘त्या’ वक्तव्यामुळे अभिनेत परेश रावल अडचणीत; पोलिसांनी दाखल केली एफआयआर
बिग ब्रेकींग! ज्येष्ठ रंगकर्मी माेहनदास सुखटणकर यांचे निधन, वयाच्या 93व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

हे देखील वाचा