Friday, March 29, 2024

बॅक टू बॅक फ्लाॅप चित्रपटांवर अखेर अक्षय कुमारने साेडले माैन; म्हणाला, ‘ही माझी चूक…’

अक्षय कुमार हा केवळ एक दमदार अभिनेताच नाही, तर एक निर्भय माणूस देखील आहे. जाे सरळ सरळ बोलण्यावर विश्वास ठेवतात. बॅक टू बॅक फ्लॉप चित्रपटांमुळे अक्षय कुमारच्या करिअरवर सातत्याने प्रश्न उपस्थित होत आहेत. काहीजण त्याला निवृत्तीचा सल्ला देत आहेत, तर काहीजण त्यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. अशा परिस्थितीत सततच्या फ्लॉप चित्रपटांवर अक्षय कुमारने बिंदास उत्तर दिले आहे.

अक्षय कुमार (akshay kumar) याच्या शेवटच्या हिट चित्रपटाबद्दल बाेलायचे झाले तर, रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सूर्यवंशी’ या चित्रपटाने 198 कोटींचा दमदार व्यवसाय बाॅक्स ऑफिसवर केला हाेता. मात्र, त्यानंतर अक्षय कुमारचे अनेक चित्रपट फ्लॉप झालेत. दरम्यान, अभिनेत्याला ओटीटीचाही सहारा घ्यावा लागला.

सलग तीन-चार फ्लॉप चित्रपटांबद्दल बोलताना अक्षय कुमार म्हणाला, “माझ्यासोबत हे पहिल्यांदाच घडत नाहीये. माझ्या करिअरमध्ये मी याआधी 16 फ्लॉप चित्रपट दिले आहेत. एक वेळ अशीही आली होती जेव्हा माझे लागाेपाठ 8 चित्रपट फ्लॉप झाले. आता ताे वेळ आहे ज्यामध्ये माझी 3-4 चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरली आहेत. या सगळ्यामागे माझी चूक आहे. चित्रपट न चालणे ही सर्वस्वी माझी चूक आहे. आता प्रेक्षक बदलले आहेत. त्यामुळे तुम्हालाही बदलावे लागेल. जर त्यांच्या गरजा बदलल्या असतील, तर तुम्हालाही त्यानुसार काम करावे लागेल.”

आपल्या करिअरबद्दल बोलताना अक्षय कुमार म्हणाला की, “हा काळ माझ्यासाठी धोक्यासारखा आहे. तुमचा चित्रपट चालत नसेल, तर तो तुमचा दोष आहे. मला जे शक्य आहे ते करण्याचा मी प्रयत्न करत आहे. मी सर्वांना सांगू इच्छितो की, जर तुमचे चित्रपट चांगले चालत नसतील, तर तुम्ही प्रेक्षक किंवा इतर कोणालाही दोष देऊ शकत नाही. ही 100 टक्के माझी चूक आहे.”

मंडळी, कोरोनाच्या काळात अक्षय कुमार हा पहिला अभिनेता होता ज्याने हिम्मत दाखवून बेलबॉटम थिएटरमध्ये  प्रदर्शित केला. यानंतर तो ‘सूर्यवंशी’मध्ये दिसला जो सुपरहिट ठरला. मात्र, त्यानंतर ‘रक्षाबंधन’, ‘सम्राट पृथ्वीराज’, ‘रामसेतू’ ते ‘सेल्फी’पर्यंतच्या चित्रपटांना प्रेक्षकांचे प्रेम मिळालेले नाही.( bollywood actor akshay kumar broke his silence on continuous flop films it is 100 percent my fault)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
शिव ठाकरेने घेतली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट, काय आहे या भेटीचे महत्त्व? जाणून घ्या…

प्रियांकाची लेक पाहून परिणितीलाही वाटतो हेवा? म्हणाली, ‘मलाही आई व्हायला… ‘

हे देखील वाचा