Saturday, June 15, 2024

अक्षय कुमारला भेटण्यासाठी चाहत्याने तोडले बॅरिकेडिंग, पुढे असे काही घडले जे पाहून तुम्ही व्हाल थक्क

बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार आणि इमरान हाश्मी त्यांच्या आगामी ‘सेल्फी‘ चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहेत. अशात नुकतेच दोन्ही स्टार्स त्यांच्या सेल्फी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पुण्यात पोहोचले हाेते. यावेळी अक्षय कुमार आणि इमरान हाश्मी यांची एक झलक पाहण्यासाठी मोठ्या संख्येने चाहते जमले होते. यादरम्यान तेथे असे काही घडले, जे पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत. काय आहे नेमके प्रकरण? चला जाणून घेऊया…

अक्षय कुमारने चाहत्याला मारली मिठी
अक्षय कुमार (akshay kumar) याचा ‘सेल्फी’ (selfiee) चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अक्षय कुमार आणि इमरान हाश्मी ‘मैं खिलाडी’ या गाण्यावर डान्स करताना आणि फॅन्ससोबत मस्ती करताना दिसत आहे. यानंतर अक्षय कुमार त्याच्या चाहत्यांशी भेट घेत आहे आणि त्यांच्याशी हात मिळवत आहे.

दरम्यान एक चाहत्याने बॅरिकेडिंगवरून उडी मारून अभिनेत्याला भेटण्याचा प्रयत्न केला. यावेळी अभिनेत्याच्या सुरक्षा रक्षकांनी चाहत्याला थांबवून अक्षयपासून दूर नेले. मात्र, अभिनेता त्याच्या गार्डमधून गेला आणि त्याच्या चाहत्याला मिठी मारली. त्यामुळे अक्षयचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अभिनेत्याचे चाहते त्याचं काैतुक करत असून त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

24 फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित हाेणार ‘सेल्फी’
‘सेल्फी’ या चित्रपटाविषयी बोलायचे झाले, तर हा चित्रपट 24 फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. अक्षय कुमार आणि इमरान हाश्मीशिवाय या चित्रपटात नुसरत भरुचा आणि डायना पेंटी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. नुकताच सेल्फी या चित्रपटाचा दुसरा ट्रेलर रिलीज झाला आहे, ज्याला खूप पसंती मिळाली आहे.(bollywood actor akshay kumar during selfiee promotion see video goes viral on internet )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
स्वराने ट्वीटमध्ये ‘भाऊ’ म्हटल्यानंतर होणाऱ्या ट्रोलिंगला फहादने दिले चाेख उत्तर; म्हणाला, ‘हिंदू-मुस्लिम भाऊ…’

सिद्धार्थ शुक्लाच्या आईचा व्हिडिओ झाला व्हायरल म्हणाल्या, ‘आजही लोकं माझ्यावर…’

हे देखील वाचा