Tuesday, June 25, 2024

शिव ठाकरेने घेतली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट, काय आहे या भेटीचे महत्त्व? जाणून घ्या…

काही दिवसांपूर्वीच हिंदी ‘बिग बॉसचे 16‘वे पर्व संपले. या पर्वामध्ये रॅपर एमसी स्टॅनने बाजी मारत विजेत्याची ट्रॉफी नावावर केली. बिग बॉसच्या एवढ्या पर्वांमधे हे पर्व माेठ्या प्रमाणात गाजले. या पर्वामध्ये शिव ठाकरे जिंकेल असा विश्वास सर्वांनाच होता. मात्र, शेवटच्या क्षणी ते स्वप्न तुटले आणि शिव पहिला रनरअप ठरला. असे असूनही शिवची लोकप्रियता अधिकच वाढत आहे. बिग बॉस झाल्यानंतर पहिल्यांदाच शिवला मनसचे प्रमुख राज ठाकरे यांनी भेटण्यासाठी बोलावले होते, ज्यांचे फाेटाे सोशल मीडियावर वेगाने व्हायरल हाेत आहे.

शिव ठाकरे (shiv thakare) हा शनिवारी (दि. 25 फेब्रुवारी) राेजी राज ठाकरे (raj thackeray) यांच्या दादर येथील शिवतीर्थ या ठिकाणी पोहोचला. यावेळी त्याने राज ठाकरेंची आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांची भेट घेतली. या भेटीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ साेशल मीडिायार तुफान व्हायरल होते आहे. फाेटाेमध्ये राज ठाकरे मध्यभागी उभे आहेत आणि शिवच्या खांद्यावर त्यांचा हात आहे.

राज ठाकरे यांना भेटल्यानंतर शिवचा आंनद गगणात मावेनासा झाला. त्यानी आपल्या बैठकीबद्दल सांगितले की, “जेव्हा जेव्हा मराठी माणूस पुढे पाऊल टाकतो, तेव्हा राज ठाकरे कायमच मुलांचे समर्थन करतात. राज ठाकरेंनी मलाही त्यासाठीच बाेलवले हाेते.” विशेष म्हणजे या बैठकीत राज ठाकरेंच्या पत्नी, उर्वशी ठाकरेही उपस्थित होत्या. त्या बिग बॉसच्या खूप मोठ्या चाहत्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shiv Thakare (@shivthakare9)

मंडळी, आम्ही तुम्हाला सांगताे की, शिव ठाकरे लवकरच ‘खतराे के खिलाडी’मध्ये दिसणार आहे. अशा परिस्थितीत, त्याचे चाहते त्याला पुन्हा एकदा छाेट्या पडद्यावर पाहण्यासाठी खूप उत्साही आहेत.(tv show bigg boss 16 fame shiv thakare met mns chief raj thackeray at his home photos goes viral on social media)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ फेम शैलेश लोढांनी सांगितलं सीरियल सोडण्यामागील खरं कारण, म्हणाले…

बाबाे! राखीच्या चेहऱ्यावर भळभळती जखम पाहून चाहत्यांना बसला धक्का; युजर्स म्हणाले, ‘कोणी मारले…’

हे देखील वाचा