Tuesday, June 25, 2024

एकीकडे ‘सेल्फी’ चित्रपट पडला, तर दुसरीकडे अक्षयची काॅन्सर्टही झाली रद्द, जाणून घ्या काय आहे कारण

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सतत फ्लॉप चित्रपट देण्यामुळे चर्चेत आहे. 2 फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सेल्फी’ हा चित्रपटही चांगलाच तोंडावर पडला. गेल्या दोन वर्षांत अक्षयचा हा ‘सहावा’ चित्रपट आहे जो बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला आहे. यापूर्वी ‘बच्चन पांडे’, ‘बेल बोटम’, ‘रक्षाबंधन’, ‘सम्राट पृथ्वीराज’, ‘रामसेतु’  या सारख्या चित्रपटांनी प्रेक्षकांना निराश केले. या सर्वांमध्ये अशी बातमी हाेती की, ‘सेल्फी’ रिलीज झाल्यानंतर अक्षय कुमार ‘द एंटरटेनर्स’ कॉन्सर्टसाठी अमेरिकेत रवाणा हाेणार होता. मात्र, आता त्याचा हा कॉन्सर्ट रद्द झाला आहे. या काॅन्सर्टमध्ये मौनी रॉय, नोरा फतेही, दिशा पटनी आणि सोनम बाजवा देखील उपस्थित राहणार हाेत्या.

‘द एंटरटेनर्स’ हा शो रद्द झाल्याची माहिती शाेचे प्रमाेटर अमित जेटली यांनी आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. ‘तिकिटांच्या अत्यंत मंद विक्रीमुळे’ हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे, असे त्याने आपल्या पोस्टमध्ये सांगितले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sai Usa Inc (@saiusainc)

टूरच्या प्रमोटरने जारी केलेल्या निवेदनानुसार, “हा शो 4 मार्च रोजी क्युर इन्शुरन्स एरेना येथे घेण्यात येणार नाही.” निवेदनात असेही सांगितले गेले आहे की, “तिकिटांच्या कमी विक्रीमुळे हा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.” हे असे हाेण्याचे कारण म्हणजे प्रमोटर्सला कोणत्याही प्रकारचे नुकसान सहन करायचे नाही. यासह, अमित म्हणाले की, “ज्यांनी तिकिट बुक केले होते त्यांची संपूर्ण पैसै परत केले जाईल.”

‘सेल्फी’ चित्रपटाविषयी बाेलयाचे झाले, तर राज मेहता दिग्दर्शित ‘सेल्फी’ या चित्रपटात अक्षय कुमार व्यतिरिक्त इमरान हाश्मी देखील आहे. मात्र, या चित्रपटाने बाॅक्स ऑफिसवर विशेष कमाई केली नाही. (bollywood actor akshay kumar mouni roy and disha patani us concert the entertainers tour reportedly cancelled due to non payment after flop film selfiee)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सलमान खानने ‘बाजीगर’ करण्यासाठी दिग्दर्शकांपुढे ठेवली होती ‘ही’ मागणी, नकार मिळाल्यानंतर सोडला होता सिनेमा

चित्रपट माफियांना ‘भिकारी’ म्हणत पुन्हा एकदा कंगना रणौतने साधला माफियांवर निशाणा

हे देखील वाचा