Monday, June 24, 2024

सलमान खानने ‘बाजीगर’ करण्यासाठी दिग्दर्शकांपुढे ठेवली होती ‘ही’ मागणी, नकार मिळाल्यानंतर सोडला होता सिनेमा

बॉलिवूडचा दबंग खान सलमान खानचे मोठे स्टारडम आहे. अनेक सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर सलमान खानने हे मोठे स्वप्नवत यश मिळवले आहे. सलमान खानला मिळालेले यश सर्वानाच हवेहवेसे वाटत असते. मात्र ते सगळ्याच्या नशिबी नसते. सलमान खानने त्याच्या कारकिर्दीमध्ये अनेक सुपरहिट ब्लॉकबस्टर सिनेमे दिले आहेत, मात्र त्याने अनेक चांगल्या चित्रपटांना नकार देखील दिला आहे. यातलाच एक सिनेमा म्हणजे ‘बाजीगर’. हो वाचून आश्चर्य वाटले ना? १९९३ साली आलेला थ्रिलर बाजीगर हा सिनेमा आधी सलमान खानलाच ऑफर करण्यात आला होता. मात्र त्याने या सिनेमाला नकार दिला. याबद्दल त्याने स्वतचः खुलासा केला आहे.


सलमान खानला जेव्हा बाजीगर सिनेमा ऑफर झाला, तेव्हा त्याला या सिनेमात काही विशिष्ट बदल अपेक्षित होते मात्र दिग्दर्शक अब्बास – मस्तान यांनी या सिनेमात कोणतेही बदल करण्यास नकार दिला. सलमान खान आणि सलीम खान यांनी दिग्दर्शकांना सांगितले की, सिनेमातील भूमिका खूपच नकारात्मक आहे, त्यामुळे सिनेमात एक मदर अँगल असावा. पण याला खोदत अब्बास मस्तान यांनी सांगितले की, हे खूपच सामान्य आहे. त्यामुळे सलमान खानने हा सिनेमा करण्यास नकार दिला. पुढे हा सिनेमा शाहरुख खानला ऑफर करण्यात आला. मात्र तेव्हा दिग्दर्शकांना सलमान आणि सलीम खान यांच्या बोलण्यात दम वाटला आणि त्यांनी हा बदल सिनेमात केला. पुढे सिनेमात राखीच्या भूमिकाने मदर अँगल आणला. सिनेमाची शूटिंग पूर्ण झाल्यानंतर अब्बास मस्तान यांनी सलमान खानला फोन करून सांगितले देखील होते की, “सिनेमात मदर अँगलची कल्पना छान होती, आम्ही ती सिनेमात वापरली आहे. तुम्हाला धन्यवाद.”

सलमान खानने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, बाजीगर न केल्याचे त्याला अजिबात दुःख नाही. उलट तो शाहरुख खानसाठी खुश आहे. जर सलमान खानने बाजीगर केला असता तर आज बँडस्टँड वर मन्नत नसते असे देखील तो म्हणाला होता. शाहरुख खानने बाजीगर केल्यानंतर त्याला खूपच वाहवा मिळाली. ९० च्या दशकात शाहरुखने डर, अंजाम आणि बाजीगर अशा अँटी हिरो चित्रपटांमध्ये काम केले होते.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मुंबई सोडण्यापूर्वी ऋतिकने पॅपराझींसमाेर साबा आझादला केले किस, व्हिडिओ व्हायरल

‘ड्रामाक्विन’ शिकवणार अभिनय? राखीने अकादमीसाठी उचलले माेठे पाऊल, एकदा व्हिडिओ पाहाच

 

हे देखील वाचा