Tuesday, June 18, 2024

जागेश्वर धामला भेट देऊन अक्षय कुमार परतला मुंबईत, विचित्र पँट घातल्याने युजर्सने उडवली अभिनेत्याची खिल्ली

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार नुकताच चित्रपटाच्या शूटिंगसाठी उत्तराखंडमध्ये गेला हाेता. यादरम्यान त्यांनी आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून केदारनाथ आणि नंतर बद्रीनाथ मंदिराचे दर्शन घेतले. इतकंच नाही, तर खिलाडी कुमारने जागेश्वर धाममध्ये प्रार्थना करून महामृत्युंजय पठणही केलं.

अक्षय कुमार (akshay kumar) याच्या उत्तराखंडमधील चार धाम यात्रेचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. अभिनेत्याला भक्तीत तल्लीन झालेले पाहून चाहत्यांनी त्याच्यावर काैतुकाचा वर्षाव केला आहे. मात्र, आता अक्षय कुमार तिथून परतला आहे. खरे तर, कलिना विमानतळावरून एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये अक्षय कुमार सिक्योरिटी सोबत जाताना दिसत आहे. या दरम्यान त्याने आपल्यासोबत एक अतरंगी बॅगही घेतली आहे, ज्याची किंमत खूप जास्त आहे. पण लोकांचे लक्ष बॅगपेक्षा त्याच्या पॅंटने वेधले आहे.

खिलाडी कुमार विमानतळावर काळी पँट आणि काळ्या टी-शर्टमध्ये दिसला. यावेळी त्याने काळ्या रंगाची लेदर बॅगही सोबत घेतली होती. अशात पॅपराझींनी खिलाडी कुमारचा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात अक्षयने घेतलेल्या बॅगची किंमत 35,000 रुपये असल्याचे नमूद केले आहे. मात्र, यादरम्यान लोकांच्या नजरा अभिनेत्याच्या पायावर पडल्या, कारण खेळाडू कुमारने एका पायात फुल पँट आणि दुसऱ्या पायात हाफ पॅन्ट घातली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

अशात एका युजरने कमेंट करत लिहिले की, ‘ही फालतू स्टाइल काय आहे?’, तर एका युजरने कमेंट करत लिहिले की, ‘पैसे असलेले लोक काहीही करू शकतात’ अशा प्रकारे युजर्स अभिनेत्याच्या या व्हिडिओवर भिन्नभिन्न कमेंट करत आहेत.

अक्षय कुमार शेवटचा या वर्षाच्या सुरुवातीला प्रदर्शित झालेल्या ‘सेल्फी’ चित्रपटात दिसला होता. अभिनेत्याच्या आगामी चित्रपटांबद्दल बाेलायचे झाले, तर त्यामध्ये ‘मैदान’, ‘सिंघम अगेन’, ‘राउडी राठौड 2’, ‘OMG – ओह माय गाॅड 2’ आणि ‘हेरा फेरी 3’ या चित्रपटांचा समावेश आहे.(bollywood actor akshay kumar spotted at kalina airport after returning from jageshwar dham uttarakhand)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही नक्की वाचा-
‘मुस्लिमांविरुद्ध द्वेष ही फॅशन झाली आहे’, नसीरुद्दीन शाह यांचे मोदी सरकारवर सडेतोड आराेप

आमिरची लाडकी आयरा महागडी कार सोडून ऑटोमधून दिसली प्रवास करताना, व्हिडिओ व्हायरल

हे देखील वाचा