Saturday, June 29, 2024

बाप-लेकाची जाेडी पाेहचली सिद्धिविनायक मंदिरात, ‘उंचाई’च्या यशासाठी अमिताभ बच्चन झाले नतमस्तक

मेगास्टार अमिताभ बच्चन यांचा ‘उंचाई‘ हा चित्रपट आज 11 नोव्हेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आज बिग बी त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन यांच्यासह सिद्धिविनायक मंदिरात पोहोचले आणि बाप्पांचा आशीर्वाद घेतला. यादरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये हे बाप-लेक एकत्र सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी जाताना दिसत आहेत.

अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) सध्या त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘ब्रेथ: इनटू द शॅडोज 2’ या वेब सीरिजच्या बंपर यशामुळे चर्चेत आहे. ही मालिका 9 नोव्हेंबर रोजी ऍमेझॉन प्राइमवर प्रसारित झाली होती. वेब सीरिजच्या यशानंतर अभिषेकनेही आपल्या वडिल अमिताभ बच्चनसोबत सिद्धिविनायक मंदिर गाठले आणि देवाचा आशीर्वाद घेतला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

इंस्टाग्रामवर अमिताभ-अभिषेक यांचा सिद्धिविनायकाच्या दर्शनाचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल हाेत आहे. व्हिडिओमध्ये दोन्ही कलाकार पांढर्‍या पारंपारिक पोशाखात दिसत आहेत. हा व्हिडिओ समोर येताच चाहत्यांना दोघांनाही एकत्र पाहून खूप आनंद झाला आहे. व्हायरल झालेल्या या पोस्टवर कमेंट करून युजर्स बाप-लेकाची जोडी अप्रतिम असल्याचे सांगत आहेत.

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या ‘उंचाई’ (uunchai) या चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, हा चित्रपट सूरज बडजात्याने बनवला आहे. या चित्रपटात अमिताभ यांच्या व्यतिरिक्त अनुपम खेर, बोमन इराणी, नीना गुप्ता, परिणीती चोप्रा, सारिका आणि डॅनी डेन्झोंगपा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. ‘उंचाई’ हा चित्रपट चार मित्रांच्या कथेवर आधारित आहे, ज्यांचे एव्हरेस्ट चढण्याचे स्वप्न आहे. या प्रवासादरम्यान त्यांना भावनिक, वैयक्तिक, आध्यात्मिक अनुभव येतात. इतकंच नाही तर ते त्यांच्या शारीरिक समस्यांशीही झगडतात. मात्र, तरीदेखील ते उंची गाठतात. हा चित्रपट मैत्री, प्रेम आणि भावनांनी भरलेला आहे. (bollywood actor amitabh bachchan abhishek bachchan snapped at siddhivinayak temple before release uunchai)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
रसिका सुनिल उर्फ शनायाच्या फोटोंनी सोशल मीडियाचे वाढवले तापमान, फोटोंवर चाहत्यांनी केला कमेंटचा वर्षाव
ब्रेकिंग! अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशी याचे वयाच्या 46 व्या वर्षी निधन

हे देखील वाचा